Bangladesh Air Force jet crashes : बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका शाळा आणि महाविद्यालयाच्या कॅम्पसवर बांगलादेश हवाई दलाच्या विमान कोसळल्याने १९ जणांचा मृत्यू झाला असून १६० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
ढाका शहरातील उत्तरा भागातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजवर हे विमान कोसळले. लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, एफ-७ बीजीआय हे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमानाने स्थानिक वेळेनुसार दुपारी १:०६ वाजता उड्डाण केले होते आणि त्यानंतर ते कोसळले.
या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर यासंबंधीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांकडून देखील अपघात झाला ते ठिकाण दाखवण्यात येत होते. या फुटेजनुसार, अपघातस्थळी आगीचे लोट आणि काळा धूर पाहायला मिळाला. दरम्यान बचाव पथकांकडून जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.
बांगलादेशच्या उत्तर उत्तरा भागात झालेल्या अपघाताच्या वेळी माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजमध्ये मुले उपस्थित होती, अशी माहिती देखील समोर आली आहे.
???? BREAKING ??
— Huda (@faisalhuda_) July 21, 2025
Training aircraft crashed at Uttara Milestone College….!#Bangladesh #Dhaka pic.twitter.com/M9f0GbPC2f
जखमी विद्यार्थ्यांना बचावासाठी लष्कराचे पथक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान स्थानिक माध्यमांना प्रत्यदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान हे माइलस्टोन कॉलेजच्या कॅन्टीनवर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोसळले.
१९ मृददेह बाहेर काढले
अपघात झाला त्या ठिकाणाहून १९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, असे द ढाका ट्रिब्यूनने अग्निशमन सेवा आणि सिव्हील डिफेन्स डायरेक्टर जनरल मुहम्मद जाहेद कमाल यांच्या हवल्याने सांगितले आहे. याबरोबरच आतापर्यंत १६४ जखमींची नोंद झाल्याचेही म्हटले आहे.