दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणातील आरोपीच्या बाजूने लढत असलेल्या दोन वकिलांविरोधात बार कौन्सिल ऑफ इंडियाने ( बीसीआय) शुक्रवारी रात्री कारणे दाखवा नोटीस जारी केली. एम.एल. शर्मा आणि ए.पी. सिंग या दोघांनी बीबीसी वाहिनीच्या वृत्तपटात महिलांविरोधी आणि त्यांचा अवमान करणारी वक्तव्ये केल्याच्या आरोपांवरून ही नोटीस जारी करण्यात आली. बीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर सुमारे मध्यरात्री हा निर्णय घेण्यात आला. प्राथमिकदृष्ट्या या वकिलांविरोधात व्यायसायिक गैरवर्तणूक केल्याचा आरोप असल्याचे समितीने नमूद केले. या नोटीसीला समाधानकार उत्तर न दिल्यास या दोन्ही वकिलांची सनद रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे, वकील शर्मा यांनी आरोप फेटाळत आपण कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसल्याचा दावा केला.
बीबीसीच्या ‘इंडियाज डॉटर’ या वादग्रस्त वृत्तपटात एम एल शर्मा यांनी ‘जर कोणतीही मुलगी सुरक्षेशिवाय बाहेर पडली तर त्यांच्यासोबत अशा घटना होणारच’ असे वक्तव्य केल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onबीबीसीBBC
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bar council of india issues show cause notices to lawyers for anti women remarks
First published on: 07-03-2015 at 01:58 IST