भारतीयांच्या आदरातिथ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपला दौरा अविस्मरणीय झाल्याचे सांगत मंगळवारी दुपारी सौदी अरेबियाकडे प्रयाण केले. जवळपास अडीच दिवसांचा ओबामा यांच्या दौऱयाचा मंगळवारी दुपारी समारोप झाला. पत्नी मिशेलसह ओबामा यांनी नवी दिल्लीतील पालम हवाई तळावरून सौदी अरेबियाकडे प्रयाण केले. व्हाईट हाऊसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ओबामा यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
भारतातून परतण्यापूर्वी ओबामा यांनी दक्षिण दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृहात निवडक मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी मनमोकळा संवाद साधला. या संवादातून भारत आणि अमेरिका मैत्रीसंबंध, मानवाधिकार, स्वातंत्र्य, महिलांची प्रगती यासह विविध विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jan 2015 रोजी प्रकाशित
अविस्मरणीय दौऱयाबद्दल ओबामांकडून मोदींचे आभार
भारतीयांच्या आदरातिथ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपला दौरा अविस्मरणीय झाल्याचे सांगत मंगळवारी दुपारी सौदी अरेबियाकडे प्रयाण केले.
First published on: 27-01-2015 at 03:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barack obama says thank you to narendra modi