अमेरिकेतील सर्वात हिंसक हल्ल्यात ओरलँडो येथे ५० जण मरण पावल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा गुरुवारी तेथे जाऊन मृतांना श्रद्धांजली वाहणार आहेत, असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जॉश अर्नेस्ट यांनी सांगितले, की गुरुवारी अध्यक्ष ओबामा फ्लोरिडातील ओरलँडो येथे जाऊन हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहतील. आयसिसविरोधात मोहिमांचा आढावा घेण्यासाठी ओबामा यांनी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पथकास बोलावून घेतले आहे. ही बैठक उद्या होत असून, बंदूक नियंत्रण कायद्यावर अमेरिकी काँग्रेसच्या निष्क्रियतेबाबत ओबामा यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. लोकांना या कायद्यातील उणिवांमुळे बंदुका सहज मिळतात, असे ओबामा यांनी म्हटल्याचे अर्नेस्ट यांनी स्पष्ट केले. हिंसाचार थांबवू शकेल असा कुठलाही एक कायदा नाह, पण काँग्रेसने शहाणपण वापरून व्यक्तिगत पातळीवर लोकांना बंदुका मिळणार नाहीत, यासाठी उपाययोजना करायला हव्यात असे ओबामा यांचे मत आहे. दहशतवादाच्या मुकाबल्याचा प्रश्न येतो तेव्हा आयसिस व इतर दहशतवादी संघटना अमेरिकेला लक्ष्य करीत आहेत, त्याबाबत अमेरिकी अध्यक्षांचा अग्रक्रम हा अमेरिकी लोकांचे संरक्षण करण्याला आहे असे अर्नेस्ट यांनी स्पष्ट केले. ओबामा यांनी ओरलँडोच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना मूलतत्त्ववादी इस्लामी व्यक्तीचे कृत्य असा शब्दप्रयोग केला नाही, याबाबत अमेरिकी अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर ओबामा यांनी काहीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barack obama to go to orlando to pay respects to victims on thursday
First published on: 15-06-2016 at 02:58 IST