उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील भाजपाचा ऐतिहासिक विजय म्हणजे २०२४ मधील आगामी लोकसभा निवडणुकीतील निकालाची चुणूक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातील विजयातून पुढे जातो, असे मानले जाते. त्याचा संदर्भ देत, मोदींनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपा यशाची पुनरावृती करेल असा दावा गुरुवारी चार राज्यांमध्ये पक्षाला मिळालेल्या यशानंतर बोलताना केलाय. मात्र आता यावरुन निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोदींचा साहेब असा उल्लेख करत टोला लगावला आहे.

नक्की वाचा >> Election Results: “महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं”

पंतप्रधान मोदी नक्की काय म्हणाले?
भाजपाच्या मुख्यालयात केलेल्या भाषणात मोदींनी या चार राज्यांचे निकाल २०२४ मधील विजयाचे संकेत देत असल्याचं म्हटलं. ‘’उत्तर प्रदेशातील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीचा निकाल निश्चित केला होता असे काही विश्लेषकांचे म्हणणे होते. उत्तर प्रदेशतील २०२२ च्या निकालाने २०२४मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शिक्कामोर्तब केले असे हे विश्लेषक आता सांगू लागतील. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल २०२२ च्या उत्तर प्रदेशातील निकालातून स्पष्ट दिसतो’’, असे मोदी म्हणाले. २०१४ व २०१९ मध्ये भाजपाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता, २०२४ची निवडणूक जिंकल्यास भाजपा सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करू शकेल.

Parambans Singh Romana on Narendra Modi
“आज ते असतील तर उद्या आपणही…”; मोदींच्या ‘त्या’ विधानावरुन शिरोमणी अकाली दल आक्रमक
lok sabha 2024, devendra fadnvis, vijay Wadettiwar, devendra fadnvis not criticise vijay Wadettiwar, vijay Wadettiwar not criticise devendra fadnvis , vijay Wadettiwar bjp entry, dharmrao baba aatram, vijay Wadettiwar bjp entry discussions, congress, state opposition leader
देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवारांचे प्रचारादरम्यान एकमेकांबद्दल मौन का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
narendra modi rahul gandhi lalu yadav
“मुघलांच्या मानसिकतेतून…”, राहुल गांधी – लालू यादवांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
Scheme for women Assemblies Candidates for women Prime Minister Narendra Modi
पहिली बाजू: महिला सशक्तीकरणाची नवी पहाट

नक्की वाचा >> Election Results: काँग्रेसमध्ये पुन्हा फूट?; पाच राज्यांमधील दारुण पराभवानंतर G-23 नेत्यांनी बोलवली बैठक

प्रशांत किशोर यांचा टोला
मोदींनी केलेल्या या वक्तव्याला प्रशांत किशोर यांनी विरोध केलाय. “भारतामधील सत्तेची लढाई २०२४ मध्येच लढली जाईल आणि तेव्हाच त्याचा निकाल लागेल. कोणत्याही राज्यांच्या निवडणुकांवरुन हे ठरणार नाही,” असं ट्विट त्यांनी केलंय. तसेच पुढे बोलताना, “साहेबांना (मोदींना) हे ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी राज्यातील निकालांवरुन असं (२०२४ च्या विजयाचं) वातावरण तयार करुन मानसिक दृष्ट्या विरोधकांविरोधात आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केलाय,” असा टोला प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदींचा थेट उल्लेख टाळत म्हटलंय.

नक्की वाचा >> Election Results: पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?; शिवसेना म्हणते, “माकडांच्या…”

तसेच प्रशांत भूषण यांनी मतदारांनाही आवाहन केलं आहे. “या खोट्या कथानकाला बळी पडू नका किंवा त्याचा भाग होऊ नका,” असंही ते ट्विटच्या शेवटी म्हणालेत.

जानेवारी महिन्यातच प्रशांत किशोर यांनी केलेला यासंदर्भातील उल्लेख
पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीही लागले तरी २०२४ मध्ये भाजपाला पराभूत करणारी आघाडी बांधता येईल असंही प्रशांत किशोर यांनी जानेवारी महिन्यामध्येच म्हटलं होतं. वेगवेगळ्या राजकीय पक्षांना थोडा समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. एका नवीन राष्ट्रीय पक्षाऐवजी राजकीय परिस्थितीबद्दल विचार करताना ‘थोडा बदल केल्यास’ हे शक्य आहे, असं प्रशांत किशोर म्हणाले होते. “२०२४ मध्ये भाजपाला पराभूत करणं शक्य आहे का? याचं उत्तर मी ठामपणे होय असं देईन. मात्र सध्या वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि पक्षांची धोरणं पाहता हे शक्य आहे का? असा प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर कदाचित नाही, असं द्यावं लागेल,” असं प्रशांत किशोर यांनी म्हटलेलं.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: अखिलेश घाबरले, राजनाथांनी टाळले, पण योगींनी करुन दाखवले; आता एवढे विक्रम होणार योगींच्या नावे

जागांचं गणित कसं मांडलेलं?
“तुम्ही जर बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळचा विचार केल्यास लोकसभेच्या जवळजवळ २०० जागा आहेत. पक्षाची लोकप्रियता शिगेला असतानाही भाजपा या ठिकाणी ५० च्या आसापासच जागा जिंकू शकलीय. बाकी राहिलेल्या ३५० जागांपैकी भाजपा कोणासाठी काहीच सोडत नाहीय,” असं सध्याच्या परिस्थितीचं विश्लेषण करताना प्रशांत किशोर म्हणाले होते.

“यावरुन असं दिसून येतं की काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेस किंवा अन्य एखादा पक्ष अथवा या पक्षांचा एकमेकांमध्ये ताळमेळ बसून एक आघाडी तयार होणार असेल तर त्यांनी एकत्रित येऊन आम्ही २०० पैकी १०० जागा जिंकणार असा निश्चय केल्यास विरोधी पक्षांना त्यांच्या लोकसभेमधील जागा २५०-२६० पर्यंत वाढवता येतील,” असंही प्रशांत किशोर यांनी अंदाज व्यक्त करताना म्हटलं होतं. “अशाच प्रकारे उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये १०० आणखीन जागा मिळवून भाजपाला पराभूत करणं शक्य आहे,” असा विश्वास प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलाय. “मला विरोधकांची अशी एक आघाडी बनवण्यात मदत करायची आहे जे २०२४ सालच्या निवडणुकीमध्ये सक्षमपणे लढू शकतील,” असंही प्रशांत किशोर म्हणाले होते.

नक्की वाचा >> Election Results: “काँग्रेस पक्ष ‘तृणमूल’मध्ये विलीन करावा, असं झाल्यास…”; काँग्रेसला ऑफर

भाजपाने साजरा केला जल्लोष
दरम्यान, गुरुवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं. गोव्यामध्ये भाजपा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. या चारही राज्यांमध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपा सत्ता स्थापन करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा,  गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपाच्या  नेत्यांनी गुरुवारी संध्याकाळी विजयोत्सव साजरा केला.