scorecardresearch

Premium

VIDEO : “मी हिंदीत पाच शब्द बोलायचो, पण अनुवादक तेलुगूत…”, राहुल गांधींनी सांगितला तेलंगणातील ‘तो’ किस्सा

राहुल गांधींनी पी. सेठी. हाजी यांचा मुलगा पी. के. बशीर यांचं कौतुक केलं आहे

rahul gandhi
राहुल गांधींनी तेलंगणा प्रचारातील एक किस्सा सांगितला आहे. ( काँग्रेस 'एक्स' अकाउंट छायाचित्र )

तेलंगणा विधानसभेसाठी आज ( ३० नोव्हेंबर ) मतदान पार पडत आहे. भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणात तळ ठोकला होता. अशातच तेलंगणात प्रचारसभेवेळी एक अनुवादक भाषणाचं भाषांतर करताना कसा अडचणीत सापडला होता, याचा किस्सा राहुल गांधींनी सांगितला आहे.

राहुल गांधी म्हणाले, “मी हिंदीत बोलताना पाच शब्द बोलत होतो. मला वाटलं, तेलुगूत किमान पाच-सात शब्दांत अनुवाद होईल. पण, अनुवादक २०, २५ ते ३० शब्द बोलायचा. कधी कधी मी बोरिंग बोलायचो. पण, तेलुगूत तेच ऐकून समोरील नागरिक आनंदी व्हायचे. तर, कधी चांगलं बोललो, तर नागरिक शांत बसायचे.”

Sanjay Raut Demand Bahrat Ratna For Balasaheb
“हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या मोदी सरकारला बाळासाहेब ठाकरेंचा भारतरत्नसाठी विसर आणि…”, ठाकरे गटाची टीका
Rahul Gandhi speaks on PM Narendra Modi Caste
Video: ‘पंतप्रधान मोदी ‘ओबीसी’ म्हणून जन्मले नाहीत’, राहुल गांधींनी थेट जातीचा केला उल्लेख
Bareilly Maulana Tauqeer Raza
“बाबरी शहीद केली आणि तीन हजार..”, मौलाना तौकिर रजा यांचं वक्तव्य, आडवाणींना म्हणाले ‘मानवतेचे मारेकरी’
What Jitendra Awhad Said?
“नथुराम गोडसे हा पहिला अतिरेकी, रणजीत सावरकरांचं मानसिक संतुलन…”, जितेंद्र आव्हाड यांची बोचरी टीका

“मी स्टेजवर फक्त हसत होतो. कारण, मला काही बोलताच येत नव्हते,” अशी मिश्कील टिप्पणीही राहुल गांधींनी केली आहे. केरळमधील कोझिकोड येथे मुस्लीम लीगचे दिवंगत नेते पी. सेठी. हाजी यांच्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधी बोलत होते. यावेळी खासदार अब्दुसमद समदानी यांनी राहुल गांधींच्या भाषणाचं मल्याळमध्ये अनुवादन केलं.

राहुल गांधी म्हणाले, “समदानी हे चांगले अनुवादक आहेत. या सोहळ्यात भाषणाचे भाषांतर करताना कुठलीही समस्या येणार नाही, याची मला खात्री आहे.”

राहुल गांधींनी पी. सेठी. हाजी यांचा मुलगा पी. के. बशीर यांचं कौतुक केलं आहे. “हाजी यांच्याबद्दल मला जास्त माहिती नाही. कारण, मी त्यांना कधीही भेटलो नव्हतो. पण, त्यांच्या मुलाकडे पाहून ते कसे असतील, याचा अंदाज लावू शकता.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Being my translator can be dangerous job rahul gandhi shares story from telangana election ssa

First published on: 30-11-2023 at 17:51 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×