बंगालच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सरकारी विद्यापीठांचे कुलपती बनवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यासंबंधीचे विधेयक विधानसभेत आणले जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांनी दिली आहे. यापुढे सरकारी विद्यापीठांचे कुलपती राज्यपाल नसून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनखर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात अनेक मुद्द्यांवरून वाद सुरू आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजूरी

राज्याचे शिक्षणमंत्री ब्रात्य बसू यांनी गुरुवारी राज्य सचिवालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विशेष म्हणजे, गुरुवारी राज्य सचिवालयात मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना राज्याचे शिक्षणमंत्री म्हणाले की, राज्यपालांच्या जागी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. बंगालच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सरकारी विद्यापीठांचे कुलपती बनवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे.

बंगाल विधानसभेत मांडणार प्रस्ताव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बसू म्हणाले की, हा प्रस्ताव लवकरच पश्चिम बंगाल विधानसभेत विधेयकाच्या रूपात मांडला जाईल. राज्यपाल सध्या सरकारी विद्यापीठांचे कुलपती आहेत. मात्र, पश्चिम बंगाल विधानसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे त्यांच्या संमतीसाठी पाठवले जाते आणि राज्यपाल त्यास मान्यता देतात की नाही, हे येणारा काळच सांगेल.