Bathroom Cleaner Acid Throw on Wife Face : बंगळुरूमध्ये पतीने त्याच्या पत्नीवर टॉयलेट क्लिनर अॅसिड ओतल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणात संबंधित महिला सध्या रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर आहे. पण तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे. पीटीआयच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं.

१९ मे रोजी सकाळी ९ वाजता उत्तर बंगळुरूतील सिदेदहल्ली येथील एनएमएच लेआऊट येथे संबंधित आरोपीने त्याच्या पत्नीकडे दारुसाठी पैसे मागितली. पत्नी पेशाने ब्युटिशिअन आहे. तिने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अखेर तिने पैसे दिले आणि तो घरी दारू पिऊन आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरी दाऊ पिऊन आल्यानंतर त्याने मोबाईल मोठ्या आवाज गाणी लावली. त्यामुळे गाण्यांचा आवाज कमी ठेवण्याची विनंती पत्नीने केली. पण त्याने नकार दिला आणि त्यांच्यात वाद झाला. या वादात त्याने बाथरूममधून टॉयलेट अॅसिड क्लिनरची बाटली आणली आणि ती तिच्या चेहऱ्यावर ओतली. त्यामुळे तत्काळ ती महिला जोराने ओरडू लागली. तेव्हा तिचा पती घटनास्थळावरून पळून गेला. शेजाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसंच पोलिसांनाही यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिकारी अजूनही पतीचा शोध घेत आहेत.