Girl Falls from Building while Recordign Reel: सोशल मीडियावर रिल बनवून पोस्ट करणे हा अनेक तरूणांचा छंद बनला आहे. दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रिल किंवा फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्याची अनेकांना सवय लागलेली आहे. पण हे रिल बनविणं अनेकांच्या जीवावर बेतलं आहे. बंगळुरूमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरूणीचा रिल बनविताना १३ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. ही मुलगी आपल्या मित्र-मैत्रिणींसह एका निर्माणाधीन इमारतीमध्ये पार्टी करण्यासाठी गेली होती. तिथे प्रेमसंबंधावरून भांडण झाल्यानंतर ती दुःखी रिल बनविणार होती. मात्र त्याचवेळी तिचा तोल गेल्यामुळे ती खाली कोसळली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूणीचे नाव नंदिनी असून ती मुळची बिहारची आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींसह पार्टी करण्यासाठी ती रात्री या इमारतीत आली होती. मात्र प्रेम संबंधाच्या प्रकरणावरून तिचा वाद झाला. या वादानंतर तरूणी काही जणांबरोबर गच्चीवर गेली आणि तिथे दुःखी रील बनवत होती. मात्र तोल गेल्यामुळे ती खाली कोसळली.

मृत मुलीच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधून आलेली नंदिनी येथे एका मॉलमध्ये काम करत होती. पोलीस उपायुक्त फातिमा यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, मृत तरूणी आणि तिचे मित्र इमारतीमध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांच्यापैकी काहीजण टेरेसवर जाऊन रिल रेकॉर्ड करत होते. मात्र नंदिनीचा रिल बनविताना तोल गेला आणि ती खाली पडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुक्त फातिमा पुढे म्हणाल्या, त्यांच्यात काय वाद झाला, याची शहानिशा केलेली नाही. अपघाती मृत्यूची तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांकडून सर्व मित्रांची चौकशी केली जाणार आहे.