पीटाआय, झालोद (गुजरात)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो न्याय यात्रा’ गुरुवारी राजस्थानमधून गुजरातमध्ये पोहोचली. तिथे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तसेच आम आदमी पार्टी (आप)च्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
narendra modi rahul gandhi lalu yadav
“मुघलांच्या मानसिकतेतून…”, राहुल गांधी – लालू यादवांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
Sangli Friendly fight will be decided by congress in Delhi tomorrow
सांगलीतील मैत्रीपूर्ण लढतीचा उद्या दिल्लीत निर्णय

‘भारत जोडो न्याय यात्रा’ राजस्थानहून गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील झालोद येथे आज दुपारी ४.४५ वाजता पोहोचली. गांधींच्या स्वागतासाठी जमलेल्या लोकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली, त्यापैकी अनेकांनी काँग्रेस नेत्यासोबत सेल्फी घेण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या स्वागतासाठी गुजरात काँग्रेसचे प्रभारी मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष शक्तीसिंह गोहिल, विरोधी पक्षनेते अमित चावडा आदी उपस्थित होते. गुजरातमध्ये दोन्ही पक्ष ‘इंडिया’ आघाडी अंतर्गत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने प्रदेश काँग्रेसनेही आप नेत्यांना यात्रेत सामील होण्याचे निमंत्रण दिले होते.

हेही वाचा >>>Lok Sabha Polls: काँग्रेसची गॅरंटी; राहुल गांधींनी देशातील युवकांना दिली ‘पाच’ आश्वासनं

राहुल यांच्या स्वागतासाठी आपचे प्रदेशाध्यक्ष इसुदान गढवी आणि पक्षाचे नेते गोपाल इटालिया हे देखील उपस्थित होते. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मनीष दोशी यांनी सांगितले की, ‘गुजरातमधील चार दिवसांच्या दौऱ्यात, गांधी सहा जाहीर सभांना संबोधित करतील, २७ पथ सभा घेतील. दहा मार्चला संध्याकाळी नवगाम येथे ही यात्रा दाहोद, पंचमहाल, छोटा उदयपूर, भरूच, तापी, सुरत आणि नवसारी जिल्ह्यातून महाराष्ट्रात दाखल होईल, असे ते म्हणाले.