पाण्याच्या भांड्याला हात लावल्यावरून राजस्थानमध्ये इंद्रकुमार मेघवाल या दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी मेघवाल कुटुंबियांनी केली होती. मात्र, सरकारने त्यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आज भीम आर्मीच्या चार दलित नेत्यांनी राजस्थान विधानसभेपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या सरकारी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केले आहे. मेघवाल यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी, अशी भीम आर्मीच्या नेत्यांनी केली आहे.

हेही वाचा – विनायक मेटेंचा अपघात की घातपात? व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर खळबळ, पत्नीने केली चौकशीची मागणी, म्हणाल्या “मलाही…”

पाण्याच्या टाकीवर चढत भीम आर्मीचे आंदोलन

मेघवाल यांच्या कुटुंबियांच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्या, या मागणीसाठी भीम आर्मीच्या चार नेत्यांनी पहाटेपासूनच पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केले. बागचंद बेरड, लक्ष्मीकांत, बनवारीलाल आणि रवी कुमार अशी या नेत्यांची नावे आहे. जोपर्यंत मेघवाल कुटुंबियांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही सुरूच ठेऊ, असेही या नेत्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात जयपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – “तेव्हाच म्हटलं होतं, हे लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय…”, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला!

नेमकं काय आहे प्रकरण?

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सायला पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सुराणा गावात इंद्रकुमार मेघवाल या दलित विद्यार्थ्याने पाण्याच्या भांड्याला हात लावण्याने शिक्षकाने त्याला मारहाण केली होती. गेल्या २४ दिवसांपासून त्याच्यावर अहमदाबामध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.