मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा एक बदल केलेला कथित व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत होता. दरम्यान, हा व्हायरल कथित व्हिडीओ काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला होता. तसंच त्यानंतर ११ जणांनी तो व्हिडीओ रिट्विट केला. याप्रकरणी आता कारवाई सुरू करण्यात आली असून दिग्विजय सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्योबतच ११ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२ जानेवारी २०२० रोजी विरोधीपक्षात असताना कमलनाथ सरकारच्या मद्यविषयक धोरणांवर टीका करत शिवराज सिंग चौहान यांनी २ मिनिटं १९ सेकंदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तसंच त्यानंतर त्या व्हिडीओमध्ये काही बदल करून तो ९ सेकंदांचा व्हायरल करण्यात आला होता. तसाच तो व्हिडीओ चौहान यांचाच असल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान, तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आणखी वाचा- “हे या लॉकडाउननं सिद्ध केलं”; आईन्स्टाईन यांचं वाक्य शेअर करत राहुल गांधींची मोदींवर टीका

हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर शिवराज सिंग चौहान यांनी याप्रकरणी कारवाईचा इशारा दिला होता. तसंच जे लोक हा व्हिडीओ शेअर करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, दिग्विजय सिंग यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवरून शेअर केला होता.

आणखी वाचा- “…अन् नितीशकुमारांना वाटत लोकांनी घराबाहेर पडून निवडणुकीत सहभागी होण्यात कसलाही धोका नाही”

रविवारी दुपारी दिग्विजय सिंग यांनी हा व्हिडीओ ट्विटर हँडलवरून शेअर केला होता. त्यानंतर त्यांचा हा व्हिडीओ ११ जणांनी रिट्विटही कला. प्रकरण वाढल्यांतर त्यांनी हा व्हिडीओ डिलीटही केला. परंतु आता भाजपाच्या तक्रारीनंतर भोपाळ गुन्हे शाखेने दिग्विजय सिंग यांच्यासोबतच व्हिडीओ रिट्विट करणाऱ्यांवरही एफआयआर दाखल केला आहे. एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhopal crime branch registers fir against congress leader digvijaya singh under multiple sections of ipc jud
First published on: 15-06-2020 at 10:10 IST