नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी ‘रालोआ’ला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. त्यातही भाजप हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरेल. विरोधकांच्या महाआघाडीची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहील, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांमधून व्यक्त झाला आहे. बिहारमध्ये मंगळवारी झालेल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक ६८.६५ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यामध्ये ६४.६६ टक्के मतदान झाले होते.

बिहारमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर मंगळवारी, प्रमुख ९ सर्व्हेक्षण (पान १० वर) (पान १ वरून) संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांनुसार, ‘रालोआ’ला १३३ ते १६७ जागा मिळण्याची शक्यता आहे. २४३ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी १२२ जागा लागतील. अर्थात हे मतदानोत्तर अंदाज चुकीचे ठरू शकतात. बिहारमधील पूर्वीच्या निवडणुकांमधील मतदानोत्तर चाचण्यांमधील अंदाज अनेकदा चुकीचे ठरले आहेत. २०२० मध्ये बहुतांश सर्वेक्षणांनी तेजस्वी यादव यांच्या ह्यमहागठबंधनह्णच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला होता. पण, प्रत्यक्ष निकालात ह्यएनडीएह्णने १२५ जागा जिंकून सत्ता राखली. यावेळी ह्यमहाआघाडीलाह्णला ७० ते १०८ जागा मिळू शकतील. २०२०मध्ये महागठबंधनला ११० जागा मिळाल्या होत्या. तर अॅक्सिस माय इंडिया आणि टुडेज चाणक्य हे बुधवारी त्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे कौल जाहीर करतील. मतमोजणी शुक्रवारी १४ नोव्हेंबरला होणार आहे.

नितीशकुमारांचे काय?

‘एनडीए’मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री भाजपचा होईल की, नितीशकुमारच कायम राहतील याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. हे अंदाज खरे ठरले तर नितीशकुमार यांची उचलबांगडी होऊन बिहारच्या राजकारणात मोठा बदलही घडण्याची शक्यता आहे. ‘राजद’ने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार केले होते मात्र, ‘महाआघाडी’ला बहुमत मिळाले नाही तर तेजस्वीचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न दुसऱ्यांदा भंग होण्याची शक्यता आहे.

संस्था / एजन्सी रालोआ महाआघाडी इतर

चाणक्य स्ट्रॅटेजीज १३०१३८ १००१०८ ०

दैनिक भास्कर १४५१६० ७३९१ ०३

डीव्ही रिसर्च १३७१५२ ८३९८ २४

जेव्हीसी १३५१५० ८८१०३ ०१

मॅट्राईझ १४७१६७ ७०९० ०२

पीमार्क १४२१६२ ८०९८ १४

पीपल्स इन्साईट १३३१४८ ८७१०२ ०२

पीपल्स पल्स १३३१५९ ७५१०१ ०५

टीआयएफ रिसर्च १४५१६३ ७६९५ ०

सरासरी १४७ ९० १