बिहार विधानसभेच्या निवडणुका या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. भाजप व जनता परिवार यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित असलेल्या या निवडणुकीत धनशक्ती व गुंडशक्ती यांना आळा घालण्याकरता मोठय़ा प्रमाणावर केंद्रीय सुरक्षा दले तैनात करणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवणारी प्रभावी यंत्रणा राबवणे हे उपाय योजले जाणार आहेत.
मतदार याद्या येत्या ३१ जुलैपर्यंत तयार होतील, असे सांगताना मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी बिहारच्या निवडणुकांचे वर्णन ‘सर्व निवडणुकांची आई’ असे केले. संवेदनशीलतेच्या आधारावर बिहारच्या सर्व मतदारसंघांचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2015 रोजी प्रकाशित
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बिहारमध्ये निवडणूक
बिहार विधानसभेच्या निवडणुका या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

First published on: 18-05-2015 at 02:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar assembly elections will be held sometime in september october 2015 cec