नितीशकुमार यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत, ते आपले मोठे भाऊ आहेत, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी आपली निष्ठा व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये मतभेद असल्याचे वृत्त होते. जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांची संपर्क यात्रा येथे आली होती. मांझी यांनी व्यासपीठावर नितीशकुमार यांच्यासाठी ४० मिनिटे वाट पाहिली. नितीशकुमार आमचे सर्वोच्च नेते आहेत, तसेच आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यांचा प्रत्येक शब्द सरकारसाठी महत्त्वाचा आहे, असे स्पष्ट केले. नितीशकुमार हेच नेते आहेत हे वारंवार सांगत मांझी यांनी मतभेदाचे वृत्त फेटाळून लावले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2014 रोजी प्रकाशित
नितीशकुमारांचा शब्द सरकारसाठी महत्त्वाचा : मांझी
नितीशकुमार यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत, ते आपले मोठे भाऊ आहेत, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी आपली निष्ठा व्यक्त केली.
First published on: 27-11-2014 at 04:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar cm manjhi counts his days as nitish kumar looks at a return