Bihar Election 2025 Actual Results vs Exit Polls survey predictions : बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी एनडीएने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. तर, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील विरोधी ‘महागठबंधन’ला जेमतेम ३५ जागांवर विजय मिळवता आला. काँग्रेसला दोन आकडी जागाही मिळवता आल्या नाहीत.

दुसऱ्या बाजूला बिहारच्या जनतेला नवा पर्याय देऊ पाहणारे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला भोपळा देखील फोडता आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि प्रचारातील प्रभाव पुन्हा एकदा दिसून आला. तर, संयुक्त जनता दलाचे नेते तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची ‘सुशासनबाबू’ अशी प्रतिमा विजय मिळवण्यात महत्त्वाची ठरली.

बिहारमधील सर्वच भागांमध्ये विरोधी पक्षीयांची पीछेहाट झाली. केवळ मुस्लीमबहूल सीमांचल भागात सत्ताधाऱ्यांना कमी मतं मिळाली. मात्र, तिथे देखील एमआयएम व राजदमधील संघर्षाचा एनडीएला फायदा झाला.

कोणता एक्झिट पोल खरा ठरला

दरम्यान, या निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर १० ते १५ संस्था व प्रसारमाध्यमांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले होते. या सर्वच संस्थांनी एनडीएच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. परंतु, कोणत्या संस्थेचा एक्झिट पोल खरा ठरला याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

.१०
युती-आघाडीपीपल्स पल्सपीपल्स इन्साइट्सMatrizeदैनिक भास्करP-MarqJVCडीव्ही रीसर्चपोल डायरीएबीपीचाणक्य स्ट्रॅटेजिस
एनडीए१३३ ते १५९१३३ ते १४८१४७ ते १६७१४५ ते १६०१४२ ते १६२१३५ ते १५०१३७ ते १५२१८४ ते २०९१३३ ते १४८१३० ते १३८
महाआघाडी७५ ते १०१८७ ते १०२७० ते ९०७३ ते ९१८० ते ९८८८ ते १०३८३ ते ९८३२ ते ४९८७ ते १०२१०० ते १०८
जनसुराज० ते ५० ते २० ते ३१ ते ४० ते ४
इतर२ ते ८३ ते ६५ ते ७० ते ३३ ते ७२ ते ३१ ते ५३ ते ५३ ते ५

निवडणुकीचा निकाल

एनडीएमहाआघाडी
पक्षजागापक्षजागा
भाजपा८९राष्ट्रीय जनता दल२५
संयुक्त जनता दल८५कॉँग्रेस
लोकजनशक्ती पार्टी१९कम्युनिस्ट (M-L)
राष्ट्रीय लोक मोर्चाकम्युनिस्ट (M)
एकूण२०२एकूण३४

कोणत्या संस्थेचा एक्झिट पोल खरा ठरला

पोल डायरीने एनडीएला १८४ ते २०९ जागा मिळती असा अंदाज व्यक्त केला होता. तसेच, महाआघाडीला ३२ ते ४९ जागा मिळतील असं म्हटलं होतं. बिहारमध्ये एनडीएने २०२ व महाआघाडीने ३४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पोल डायरीचा अंदाज खरा ठरला आहे.