बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात एका १८ वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली. वडिलांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी पीडितेनेच छुपा कॅमेरा वापरून हा व्हिडिओ शूट केला असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून घडलेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू


आरोपी बापाला अटक
आरोपी हा व्यवसायाने शिक्षक असून समस्तीपूर येथील रोसेरा येथे राहतो. त्याच्या १८ वर्षांच्या मुलीने त्याच्यावर बलात्कार आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला असून आरोपी वडिलांना अटक केली असल्याची माहिती रोसेरा उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक सहियार अख्तर यांनी दिली.

हेही वाचा- हिंगोली : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात माय-लेकाचा मृत्यू


आईने वडिलांना विरोध केला नाही
व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी पीडितेला मारहाण करताना दिसून आले आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत का याचाही तपास सुरू आहे. विषेश म्हणजे या सगळ्या प्रकाराला पीडितेच्या आईने विरोध केला नसल्याचे तक्रारीत म्हणले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar girl shoots video of father raping her shares on social media to seek justice dpj91
First published on: 09-05-2022 at 12:58 IST