बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्ताबदल होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अवघे दोन महिने राहिले असताना जनता दल (युनायटेड)चे प्रमुख नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाशी (RJD) असलेले महागठबंधन तोडून भाजपाचा हात पुन्हा धरण्याची तयारी सुरू केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आज राजधानी पाटणा येथे (शनिवार, २७ जानेवारी) पक्षाची बैठक घेतली. या बैठकीला आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी व माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि पक्षाचे वरिष्ठ नेते, आमदार उपस्थित होते.

नितीश कुमार इफेक्ट; अखिलेश यादव यांच्याकडून काँग्रेसची बोळवण, यूपीत देणार फक्त ११ जागा

Nana Patole and Ashok Chavan
भाजपा अन् काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली; पटोले म्हणाले, “नाचता येईना अंगण वाकडं” तर चव्हाण म्हणतात, “नानांनी भरपूर…”
mayawati bsp in up loksabha
बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?
State president of NCP Sharad Pawar faction Jayant Patil criticizes BJP
जयंत पाटील म्हणतात, ‘संविधान बदलण्याचा कट हा ‘त्यांच्या’ ४०० पारच्या घोषणेतून…”
Rashtriya Janata Dal Lalu Prasad Yadav Muslim-Yadav Loksabha Election 2024 RJD Bihar List
मुस्लीम-यादवांच्या पलीकडे जाण्याचा लालूंच्या पक्षाचा प्रयत्न; राष्ट्रीय जनता दलाने कुणाला दिली उमेदवारी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव बैठकीत म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आदरणीय आहेत आणि राहतील. पण त्यांच्याही नियंत्रणात अनेक गोष्टी नाहीत. राष्ट्रीय जनता दल आणि महागठबंधन हे नेहमीच मुख्यमंत्र्यांचा सन्मान करत राहिल. यासोबतच एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने असेही सांगितले की, बिहारच्या राजकारणात आणखी काही अनपेक्षित घडामोडी घडणार आहेत, असे विधान तेजस्वी यादव यांनी केले.

तेजस्वी यादव पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री आणि मी मंचावर शेजारी बसायचो, तेव्हा ते मला म्हणायचे की, बिहारमध्ये २००५ च्या आधी काय होते? मी त्यावर काहीही प्रतिक्रिया द्यायचो नाही. पण आता परिस्थिती बदलली असून लोक आमच्याबाजूने आहेत. मागच्या दोन दशकात ज्या काही गोष्टी करायच्या राहिल्या त्या आम्ही मागच्या काही वर्षात करण्याचा प्रयत्न केला. मग ते रोजगार देणे असेल, जातनिहाय सर्वेक्षण करणे, आरक्षणाची मर्यादा वाढविणे.. इत्यादी कामे करण्यात आली. बिहारमध्ये अजून खेळ होणे बाकी आहे.”

“हमारा इश्क नितीश कुमार की तरह…”, नेटिझन्सच्या क्रिएटिव्हिटीला उधाण; बिहारमधील घडामोडींवर तुफान मीम्स व्हायरल!

बिहारच्या विधानसभेतील सदस्यसंख्या २४३ एवढी आहे. २०२० साली विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या होत्या. त्या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे ७९ आमदार निवडून आले. त्यानंतर दुसऱ्या क्रमाकांवर भाजपाचे ७८ आमदार आहेत. जदयू पक्ष विधानसभेत तिसऱ्या क्रमाकांवर असून त्यांच्याकडे ४५ आमदारांचे संख्याबळ आहे. तर काँग्रेसकडे १९, सीपीआय (एम-एल) कडे १२ आमदार आहेत. सीपीआय (एम) आणि सीपीआयकडे प्रत्येकी दोन आमदार आहेत. हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे चार आमदार आणि एमआयएम पक्षाचा एक आमदार आहे.

नितीश कुमारांनी घेतली आठवेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ; ‘सुशासन बाबू’ ते ‘पलटू कुमार’ विरोधकांचे आरोप

२०२० साली नितीश कुमार यांनी भाजपासह राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र २०२२ साली त्यांनी भाजपासह काडीमोड घेत, आरजेडी पक्षाबरोबर आघाडी करून सत्ता स्थापन केली. तेव्हापासून ते भाजपाच्या विरोधात विरोधकांची आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेत होते. २८ पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली होती. मात्र इंडिया आघाडीत मानाचे स्थान न मिळाल्याने नितीश कुमार गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. त्यातच त्यांनी हा निर्णय घेतला की काय? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.