बिहारच्या कैमूर जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे एका गोदामात जप्त करण्यात आलेल्या बियरचे 200 कॅन रिकामे आढळले आहेत. ही दारू उंदरांनी फस्त केल्याचे कारण येथील अधिकाऱ्यांनी दिलं आहे. यापूर्वीही बिहारमध्ये तब्बल नऊ लाख लिटर दारू गायब झाली होती, त्यावेळीही अधिकाऱ्यांनी उंदरांवर आरोप केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कैमूर जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवायांत जप्त करण्यात आलेली दारू भभुआ येथील गोदामात ठेवण्यात आली होती. उत्पादन शुल्क विभागाने 2016 पासून काढलेल्या मोहिमांमध्ये ही दारू तस्करांकडून जप्त करण्यात आली होती. सोमवारी ही दारु नष्ट करण्याचे काम सुरू असताना 200 बियरच्या कॅन रिकाम्या आढळल्या. उंदरांनी या बियरच्या कॅन कुरतडल्या, त्यामुळे त्या सर्व कॅनला छिद्र पडलं होतं, परिणामी त्या कॅन रिकाम्या झाल्या असू शकतात असं उत्तर अधिकाऱ्यांनी दिलं आहे. भभुआ जिल्ह्याचे डीएम अनुपम कुमारींनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील जप्त केलेली दारु नष्ट करण्याची मोहिम सुरू होती. ज्यावेळी गोदामात पोहोचलो तेव्हा बियरच्या कॅनला छिद्र दिसत होतं आणि त्यातून दारु गायब होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar officials blame rats for seized beer cans found empty
First published on: 03-10-2018 at 20:33 IST