नक्षलग्रस्त कैमूर भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे. उद्या कैमूर येथे पंतप्रधान सभा घेणार आहेत.
यापूर्वी सुरक्षेच्या कारणावरून जिल्हाधिका-यांनी पंतप्रधानांच्या सभेला परवानगी नाकारली होती. त्यामुळे, सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारल्याचे सांगितले जात असले तरी जिल्हाधिकारी सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, भाजपने सभेला कमीत कमी गर्दी होईल आणि त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतर आज सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे.
झारखंड आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेच्या जवळ असलेला कैमूर हा भाग नक्षलग्रस्त असून येथील सभेला ३० हजार जण उपस्थित राहणार असल्याचे कळते. दरम्यान, आज चैत्यभूमीजवळ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Oct 2015 रोजी प्रकाशित
नक्षलग्रस्त कैमूर भागातील पंतप्रधानांच्या सभेला हिरवा कंदील
नक्षलग्रस्त कैमूर भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 11-10-2015 at 12:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar polls pm narendra modi got permission for kaimur rally