No Confidence Motion in Lok sabha: लोकसभेचं कामकाज सुरु होताच विरोधकांना धक्का बसला आहे. बिजू जनता दलाच्या (बीजेडी) खासदारांनी सभात्याग करत अविश्वास प्रस्ताव मतदानावर बहिष्कार टाकला आहे. बीजेडीच्या २० खासदारांनी अविश्वास प्रस्तावावर बहिष्कार टाकत सभात्याग केला आहे. बीजेडीचे एकूण २० खासदार आहेत. बीजेडीने सभात्याग केला असताना शिवसेनेने मात्र तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार सभागृहात हजर न राहत तटस्थ भूमिका घेणार असल्याचं सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरीकडे विरोधकांना चर्चेसाठी एकूण ३९ मिनिटांचा वेळ देण्यात आला असून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने पक्षाची बाजू मांडण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. मात्र लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे. संध्याकाळी ६ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे.

जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास शुक्रवारी मतदान होणार आहे. सत्ताधारी भाजपाकडे पुरेसे संख्याबळ असून केंद्र सरकारला धोका नसला तरी प्रादेशिक पक्ष कोणाला साथ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान याआधी पंतप्रधान नरेंद मोदींनी ट्विट करत ‘आज संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. कोणत्याही अडथळ्याविना सविस्तर चर्चा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biju janata dal bjd walks out of the lok sabha no confidence motion
First published on: 20-07-2018 at 11:28 IST