कोची : ख्रिस्ती जोगिणीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून कनिष्ठ न्यायालयाने शुक्रवारी दोषमुक्त केलेले कॅथलिक धर्मगुरू फ्रँको मलक्कल यांनी  न्यायालयाच्या आवारात  पत्रकारांशी बोलताना ईश्वराचा जयजयकार असो, असे उद्गार काढले. भारतात कॅथलिक बिशपला बलात्कार आणि लैंगिक छळाच्या प्रकरणात अटक झाल्याचे हे पहिलेच प्रकरण होते.

कोट्टायम येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने याप्रकरणी मलक्कल यांना याप्रकरणी निर्दोष ठरविले. त्यांच्यावर एका कॅथलिक जोगिणीवर बलात्काराचा आरोप होता. मलक्कल हे जालंधरचे बिशप होते. हे बलात्काराचे प्रकरण २०१८ मध्ये उद्भवल्यानंतर त्यांच्याकडील चर्चचा प्रशासकीय कार्यभार काढून घेण्यात आला होता.

EX Jharkhand CM Hemant Soren Moves sc for bail
हेमंत सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; अटकेविरुद्धच्या याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नसल्याचा आरोप 
arvind kejriwal
उच्च न्यायालयाने अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळताच केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव, दिलासा मिळणार?
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Arvind Kejriwal to judicial custody
अरविंद केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिहारमध्ये रवानगी होण्याची शक्यता

न्यायालयाने निकाल जाहीर केल्यावर  मलक्कल यांना न्यायालयातच रडू कोसळले. त्यांनी त्यांच्या वकिलास  आलिंगन दिले. 

मलक्कल यांना याप्रकरणी सप्टेंबर २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध एका जोगिणीने तक्रार केली होती. तिच्या म्हणण्यानुसार, मलक्कल यांनी तिच्यावर १३ वेळा बलात्कार केला होता. कोट्टायम जिल्ह्यातील उपासना स्थळातील तिच्या निवासस्थानी हा प्रकार घडल्याचा तिचा दावा होता. ५ मे २०१४ पासून दोन वर्षे हा प्रकार सुरू होता, असा तिचा दावा होता. याप्रकरणी मलक्कल  २५ दिवस न्यायालयीन कोठडीत होते.

निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.

निकालास आव्हान देणार

या प्रकरणाचे तपास अधिकारी आणि कोट्टायमचे माजी पोलीस अधीक्षक एस. हरिशंकर म्हणाले की, कनिष्ठ न्यायालयाचा हा निकाल आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवी तसेच धक्कादायक आहे. या प्रकरणात आरोपीली पूर्ण शिक्षा होईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. आम्ही या निकालास आव्हान देणार आहोत. आमच्याकडे याप्रकरणी सुसंगत असा बराचसा पुरावा आहे. या खटल्यातले सर्वच साक्षीदार हे सर्वसामान्य लोक होते.

फ्रँको मलक्कल