ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात देशहिताशी तडजोड करून या हेलिकॉप्टरच्या उत्पादकाला किती सवलती दिल्या याचे सोनिया गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी जाब विचारला. या मुद्यावर भाजप व काँग्रेस यांनी संसदेत एकमेकांविरुद्ध हक्कभंग युद्धही छेडले आहे.
३६०० कोटी रुपयांच्या या व्यवहारात लाच घेणाऱ्यांची नावे सोनिया गांधी यांनी जाहीर करावी या मागणीचा शहा यांनी पुनरुच्चार केला.
सरकारने दोन महिन्यांत या व्यवहारातील सत्य हुडकून काढावे असे आव्हान राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी दिले. ऑगस्टावेस्टलँडची मुख्य कंपनी असलेल्या ‘फिनमेकॅनिका’ कंपनीला तत्कालीनयूपीए सरकारने काळ्या यादीत टाकले होते, असे विधान केल्याबद्दल सुब्रमण्यम स्वामी यांनी आझाद यांच्याविरुद्ध राज्यसभेत हक्कभंगाची नोटीस दिली आहे. या व्यवहाराबाबत सभागृहाबाहेर निवेदन केल्याबद्दल काँग्रेसने संरक्षण मंत्रालयाविरुद्ध अशाचप्रकारची नोटीस देऊन भाजपला प्रत्युत्तर दिले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2016 रोजी प्रकाशित
हेलिकॉप्टर मुद्यावर भाजप, काँग्रेसचे ‘हक्कभंग युद्ध’
ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात देशहिताशी तडजोड करून या हेलिकॉप्टरच्या उत्पादकाला किती सवलती दिल्या
First published on: 30-04-2016 at 00:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp and congress party battles on agustawestland scam