राज्यात औद्यागिकीकरणाचा अभाव असल्याची टीका भाजपने मंगळवारी पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसवर केली. राज्यात कायद्याचे राज्यच अस्तित्वात नसल्याने येथे कोणीही सुरक्षित नाही, असेही भाजपने म्हटले आहे.
बंगालमध्ये एकही उद्योग आलेला नाही, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिंगुरच्या शेतकऱ्यांना जमिनी देण्याचे दिलेले आश्वासन पाळलेले नाही, सिंगूर भूचळवळीमुळेच बॅनर्जी यांना २०११ ची निवडणूक जिंकता आली होती, असे भाजपचे राष्ट्रीय सचिव राहु सिन्हा म्हणाले.
पश्चिम बंगालमधील सर्वसामान्य जनता कायद्याचे राज्य नसल्यान सुरक्षित नाही, असे कैलास विजयवर्गीय म्हणाले. राज्यात मा, माटी,मानूष सुरक्षित नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2016 रोजी प्रकाशित
प. बंगालमध्ये कायद्याचे राज्यच नसल्याची भाजपची टीका
राज्यात कायद्याचे राज्यच अस्तित्वात नसल्याने येथे कोणीही सुरक्षित नाही

First published on: 02-03-2016 at 01:51 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp criticism about west bengal