BJP Kiren Rijiju slams Rahul Gandhi : केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अमेरिकेतील धनाढ्य आणि गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस याचे नाव घेत काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी निवडणूक जिंकू शकले नाहीत की ते भारतविरोधी शक्तींबरोबर मिळून देशाचे सरकार आणि संस्थांवर हल्ले करतात असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच राहुल गांधी हे सध्या धोकादायक मार्गावर चालत असल्याचा इशारा देखील रिजिजू यांनी दिला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले, “जेव्हा काँग्रेस पक्ष निवडणूक जिंकू शकत नाही, तेव्हा भारतविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून सरकार आणि संस्थाांवर हल्ला सुरू करतात, जेणेकरून लोकांचा देश आणि देशाच्या संस्थांप्रती विश्वास संपुष्टात येईल. न्यायसंस्थेला कमकुवत करण्यासाठी आ लोकांनी सतत आरोप केला आहे की भारतीय न्यायसंस्था विकली गेली आहे.हे म्हणतात की भारतीय निवडणूक आयोग विकाला गेलेला आहे. पुन्हा म्हणतात की हे सरकार चोरी (मत चोरी) करून बनवलेले आहे.”

“देशाला कमजोर करण्यासाठी जेव्हा हे योजना, षडयंत्र रचतात. देशातील सरकारची विश्वासार्हता, देशातील संस्थांच्या विश्वासार्हता यावर जेव्हा हल्ला करतात तेव्हा आंदोलन उभे राहते. अशा प्रकारच्या मानसिकतेने, डाव्या विचारसरणीशी जोडून हे लोक काम करत आहेत,” असे किरेन रिजिजू म्हणाले.

राहुल गांधी यांच्या आधी अनेक काँग्रेसचे नेते झाले. ते भ्रष्ट, कमकुवत, चांगले असतील… पण देशाला कमजोर करण्यासाठी त्यांनी काम केले नाही.राहुल गांधी हे तर खूप धोकादायक मार्गावर जात आहेत. जे जॉर्ज सोरोस म्हणतात की भारताच्या सरकारला अस्थिर करण्यासाठी १ ट्रिलियन डॉलर ठेवले आहेत किंवा भारतविरोधी खलिस्तान फोर्स कॅनडा-युएस-युकेमध्ये बसल्या आहेत, अनेक डाव्या संघटना आहेत ज्या देशाच्या विरोधात षडयंत्र रचत आहेत, त्यांच्याशी ताळमेळ ठेवून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष काम करत आहे. हा देशासाठी एक चिंतेचा काळ आहे.”

“मात्र, निश्चित राहा मोदींच्या नेतृत्वात देशाला कोणीही अस्थिर करू शकत नाही. मी सरकारमध्ये आहे, मी पाहतो की किती बारकाईने देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी मोदी आणि त्यांचे सरकार समर्पित आहे. याचा तुम्ही विचारही करू शकत नाहीत. असे सरकार स्वातंत्र्यानंतर लगेच मिळालं असते तर आज देश आधीच विकसित बनलेला असता. या लोकांनी भारताला गरीब देश बनवून ठेवलं,” असा आरोपही रिजुजूंनी केला.