BJP MLA Balmukund Acharya Viral Video : भाजपाचे आमदार बालमुकुंदाचार्य हे राष्ट्रीय ध्वजाप्रमाणे रंग असलेल्या एका कापडाने घाम पुसतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर सोशल मीडियावर तसेच विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होते. काँग्रेस नेत्यांकडून सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, तसेच भाजपा आमदाराने तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप करत माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. यानंतर आता भाजपा आमदारा बालमुकुंदाचार्य यांनी या व्हिडीओबद्दल स्पष्टीकरण देत त्यांची बाजू मांडली आहे.
काँग्रेसचा आरोप
काँग्रेसचे आमदारा आणि राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्षनेते टीका राम जुली यांनी भाजपा आमदाराचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. “तिरंगा देशाची शान आहे, रुमाल नाही. ज्या तिरंग्यासाठी आपले वीर जवान प्राणाची आहुती देतात, त्या तिरंग्याने भाजापाचे जयपूरचे आमदार बालमुकुंदाचार्य नाक पुसत आहेत. हे भाजपावाल्याच्या फक्त दुटप्पी वागणूक नाही, तर देश आणि संविधानाबद्दल गद्दारी आहे. त्या लाखो शहीदांच्या बलिदानाचा अवमान आहे ज्यांनी या तिरंग्यासाठी त्यांचा झीव दिला. आमदार बालमुकुंदाचार्य माफी मागा,” असे जुली म्हणाले होते. दरम्यान आज काँग्रेसच्या आरोपांवर तसेच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर बालमुकुंदाचार्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तिरंगा देश की शान है, कोई रूमाल नहीं
— Tika Ram Jully (@TikaRamJullyINC) May 15, 2025
जिस तिरंगे के लिए हमारे वीर जवान प्राण न्यौछावर कर देते हैं, उसी तिरंगे से भाजपा से जयपुर के विधायक बालमुकुंदाचार्य नाक पोंछ रहे हैं l
यह भाजपाइयों का सिर्फ दोहरा चरित्र नहीं, बल्कि देश और संविधान के प्रति ग़द्दारी है।
आज उन लाखों शहीदों के… pic.twitter.com/nqcFGN0Hsg
भाजपा आमदाराचं स्पष्टीकरण
भाजपा आमदार बालमुकुंदाचार्य म्हणाले की, “आज एक व्हिडीओ काटून-छाटून काँग्रेसकडून चालवला जात आहे, की तिरंग्याने घाम पुसला. तिरंग्याचा मान आणि सन्मान आम्हाला कळतो. तिरंगा तो असतो ज्यामध्ये अशोक चक्र असते. मी तिरंगा हातात घेतलेला होता. गर्दीत चालताना कोणीतरी हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे कापड हातात दिले, ज्याला मी प्रेमाने ओठांना आणि हृदयाला लावलं. ते कापड घेऊन… हातात दुसरे कापड होते, ज्याने घाम पुसला… तिरंग्याचा मान सन्मान आम्हाला कळतो….”
अच्छा बाबा ने चूम लिया नहीं तो अंध भक्त बोलते की नाक साफ की ओर मुंह पोछा.
बाबा की जय हो
'मैंने तो तिरंगे को चूमा था..'
जयपुर में तिरंगा यात्रा से वायरल हुए वीडियो पर BJP विधायक बालमुकुंदाचार्य की सफाई.#Jaipur । #TirangaYatra pic.twitter.com/9YTVr5pfkDThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Milind (@Milind_tayde_) May 16, 2025
“मी काँग्रेसला प्रश्न विचारतो की, आज तिरंगा यात्रेत तुम्ही कुठे होता? हा राजकीय कार्यक्रम नव्हता. पक्षाचा एकही झेंडा नव्हता. तिरंग्याचा अपमान काँग्रेसवाल्यांनी केला आहे. तिरंग्याचे डिझाईन घेऊन त्यावर पंजा छापला, ज्याचा रस्त्यावर अपमान केला जातो,” असेही बालमुकुंदाचार्य म्हणाले.