भाजप नेत्यांचा वाचाळपणा आणि वादग्रस्त विधाने ही काही आता जनतेसाठी नवीन राहिलेली नाहीत. मात्र, उत्तरप्रदेशातील भाजप नेत्याने प्रजासत्ताक दिनाला वादग्रस्त घोषणा देऊन कहर केला. नरेंद्र मोदींच्या वाराणसी या मतदारसंघातील या आमदाराने चक्क ‘गणतंत्र दिवस अमर रहे’, अशा घोषणा देऊन आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविले. प्रजासत्ताक दिनानिमित्त वाराणसीतील रवींद्रपुरी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाराणसीमधील आमदार लक्ष्मण आचार्य यांच्या हस्ते हे ध्वजारोहरण पार पडले. ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर भाजपचे आमदार लक्ष्मण आचार्य यांनी प्रथम ‘भारत माता की जय’ आणि त्यानंतर चक्क ‘गणतंत्र दिवस अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. विशेष गोष्ट म्हणजे त्यावेळी उपस्थितांपैकी एकाही व्यक्तीने आमदार महाशयांना थांबविण्याची तसदी घेतली नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla slogan on republic day create controversy
First published on: 27-01-2016 at 10:00 IST