इस्रायलच्या फर्म पिगासस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोन टॅप केल्याच्या बातम्या समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विदेशी मीडियाने याबाबत एक रिपोर्ट प्रकाशित करण्याची सूचना दिल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबतची माहिती भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करून दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फोन टॅपिंगवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. जवळपास २५०० लोकांचे फोन टॅप केल्याची चर्चा आहे. मंत्री, नेते, न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावर भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

” चर्चा आहे की, आज संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियनमध्ये एक रिपोर्ट प्रकाशित केलं जाणार आहे. रिपोर्टमध्ये केंद्रीय मंत्री, स्वंयसेवक संघाचे नेते, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप करण्याचं काम इस्रायलच्या फर्म पिगासस दिल्याचा खुलासा केला जाणार आहे. मला याची माहिती मिळाली तर मी यादी प्रसिद्ध करेन”, असं ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. दुसरीकडे वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियनच्या वेबसाईटवर याबाबत कोणताच दावा करण्यात आलेला नाही.

भारतासहित जगभरातील १४०० पत्रकार आणि कार्यकर्त्यांची माहिती लीक झाल्याची कबुली व्हॉट्सअॅपनं अमेरिकन फेडरल कोर्टात दिली होती. मॅसेजिंग अॅपने इस्रायलचाया एनएसओ नावाच्या कंपनीवर पिगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माहिती चोरल्याचा आरोप लावला आहे. कॉलिंग फीचरमधील एका कमतरतेमुळे ही माहिती लीक झाली होती. पेगॅसस सॉफ्टवेअरची किंमत ५६ कोटींच्या आसपास आहे. या किंमतील एका वर्षाचा परवाना मिळतो. पिगाससच्या माध्यमातून एकाच वेळी ५० मोबाईलवर नजर ठेवली जाऊ शकते. पेगॅसस सॉफ्टवेअर यूजर्सच्या परवानगीशिवाय फोन ऑफ-ऑन आणि फॉर्मेट करू शकतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp subramanian swamy tweet on phone tapping rmt
First published on: 18-07-2021 at 22:04 IST