बराकपूर :  कोलकात्यानजीक भाटपाडा येथे रविवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात  बराकपूरचे भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्यावर कथितरीत्या दगडफेक करण्यात आल्यानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांत चकमकी उडाल्या.

 उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील राजकीय संघर्षांचे केंद्र असलेल्या भाटपाडा येथे झालेल्या या चकमकींत पोलिसांच्या एका वाहनासह दोन मोटारींची मोडतोड करण्यात आली. खासदार अर्जुन सिंह यांची सुटका करण्यात येऊन त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्यात आले, असे सहपोलीस आयुक्त धुब्र ज्योती डे यांनी सांगितले. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 नजीकच्या पनिहाटी भागातील बी. टी. रोडवर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या पक्ष कार्यालयावर गावठी बॉम्ब फेकण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष झाला, असे पोलिसांनी सांगितले. दोन्ही घटनांचा तपास करण्यात येत असून, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही अशीही माहिती त्यांनी दिली.