राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजप कूचबिहार जिल्हा आणि दार्जिलिंग उपविभागाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याबाबत चिथावणी देत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी येथे केला.
या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये स्वतंत्र राज्यांच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून आंदोलन पुकारण्यात येत आहे. कूचबिहारमध्ये ग्रेटर कूचबिहार पीपल्स असोसिएशन तर दार्जिलिंग उपविभागांत गोरखा जनमुक्ती मोर्चा हे आंदोलन करीत आहे.
राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजप, कूचबिहार आणि दार्जिलिंग तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यात स्वतंत्र राज्यनिर्मितीला भाजपने नेहमीच चिथावणी दिली आहे, असे बॅनर्जी म्हणाल्या.
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2016 रोजी प्रकाशित
‘कूचबिहार, दार्जिलिंग तोडण्याचा प्रयत्न’
या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये स्वतंत्र राज्यांच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून आंदोलन पुकारण्यात येत आहे

First published on: 04-05-2016 at 02:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp trying to break cooch behar and darjeeling says mamata banerjee