Nepal aircraft crash : नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ७२ लोकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला. या घटनेमुळे जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात वैमानिकांसह सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ६८ प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्यांचा समावेश होता. दरम्यान, या अपघातानंतर मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर केले जात होते. याच मोहिमेदरम्यान विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यामुळे विमान अपघाताचे नेमके कारण काय, हे समजणार आहे.

हेही वाचा >>> …अन् त्यानं स्वत:चा मृत्यूच कॅमेऱ्यात केला कैद, नेपाळमधील विमान दुर्घटनेचा थरकाप उडवणारा VIDEO

रविवारपासून बचाव पथकाकडून विमानात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले जात होते. या विमानात एकूण ११ परदेशी पर्यटकांसह तीन नवजात मुलं होती. यामध्ये ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश, दोन कोरियन, एक अर्जेंटिना आणि एका फ्रेंच नागरिक समावेश होता. विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असतानाच आता शोधपथकाला विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला आहे. यामुळे आता विमान अपघाताचे नेमके कारण समजण्यास मदत होईल.

हेही वाचा >>> भारतातल्या सर्वात जुन्या खटल्याचा अखेर ७२ वर्षांनी लागला निकाल

अपघाताची संपूर्ण घटना झाली कैद

नेपाळमधील या विमान अपघाताची संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओमध्ये विमानातील प्रवाशानेच हा व्हिडीओ शूट केल्याचे दिसतेय. अपघाताच्या अवघ्या काही सेकंदांअगोदर हा प्रवासी आनंदात बसल्याचे दिसतेय मात्र पुढच्याच क्षणाला विमानाला आग लागल्याचे दिसत आहे. अपघाताचा हा व्हिडीओ पाहून जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> “शेवटच्या क्षणी प्लॅन बदलला आणि…”, त्या चार भारतीय तरुणांची करुण कहाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातात मृत्यू झालेले ५ भारतीय प्रवासी कोण?

दरम्यान, या अपघातात पाच भारतीय प्रवाशांचाही मृत्यू झाला आहे. अभिषेक कुशवाह (२५), सोनू जैस्वाल (३५), विशाल शर्मा (२२), संजय जैस्वाल (३५) आणि अनिल कुमार राजभर (२७) असं मृत पावलेल्या पाच भारतीय नागरिकांची नावं आहेत. संबंधित सर्वजण उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि गाझीपूर येथील रहिवासी होते. या पाचपैकी चार भारतीय शुक्रवारीच भारतातून काठमांडूला पोहोचले होते.