डेटिंग अॅपवरील बॉयफ्रेंडला भेटायला 5 हजार किमीचा प्रवास; अवयवांच्या विक्रीसाठी त्यानं केली तिची हत्या | Loksatta

डेटिंग अॅपवरील बॉयफ्रेंडला भेटायला 5 हजार किमीचा प्रवास; अवयवांच्या विक्रीसाठी त्यानं केली तिची हत्या

डेटिंग अॅपवरील बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी एका ५१ वर्षीय महिलेनं तब्बल ५ हजार किलोमीटरचा प्रवास केला. पण…

डेटिंग अॅपवरील बॉयफ्रेंडला भेटायला 5 हजार किमीचा प्रवास; अवयवांच्या विक्रीसाठी त्यानं केली तिची हत्या
डेटिंग अॅपवरील बॉयफ्रेंडला भेटायला 5 हजार किमीचा प्रवास अन्… (image- social media)

डेटिंग अॅपवरून प्रेमाचं जाळं पसरंवून प्रियकर किंवा प्रेयसीच्या भावनांचा खेळ करत लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशा धक्कादायक घटनांमध्ये पैशांची फसवणुक तर होतेच मात्र, काही जण हत्या करण्याचा गुन्हा करायलाही डगमगत नाहीत. असाच एक धक्कादायक प्रकार पेरू या देशात घडल्याने खळबळ माजली आहे. डेटिंग अॅपवरील बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी एका ५१ वर्षीय महिलेनं तब्बल ५ हजार किलोमीटरचा प्रवास केला. पण महिलेनं केलेला हा प्रवास तिच्या आयुष्यातील अखेरचा ठरला. कारण नराधम बॉयफ्रेंडने त्या महिलेची निर्घृणपणे हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे केले. महिलेच्या अवयवांची विक्री करण्यासाठी त्याने हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. ब्लांका असं हत्या झालेल्या महिलेचं नावं आहे. हुआचो समुद्र किनाऱ्यावर ९ नोव्हेंबरला या महिलेचा विचित्र अवस्थेत असलेला मृतदेह स्थानिक मच्छीमारांना सापडला.


याबाबत सविस्तर वृत्त असं की, जुलैच्या महिन्याच्या अखेरीस पेरूमध्ये लिमा या ठिकाणी बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी जाणार आहे, असं ब्लांकाने तिच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं. काही महिन्यांपूर्वी ब्लांकाची जुआनसोबत ऑनलाईन डेटिंग अॅपवरून मैत्री झाली होती. त्यामुळे ब्लांका तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी त्याच्या राहत्या ठिकाणी हुआचोमध्ये कोस्टल शहरात गेली होती. ७ नोव्हेंबरला ब्लांकाने तिची भाची कार्लाला संपर्क केला आणि त्यांच्यातील प्रेमसंबंध चांगले झाले आहेत, असं तिनं कार्लाला सांगितलं.

आणखी वाचा – …..तर PNB बॅंकेच्या खातेधारकांना पैसे काढता येणार नाहीत, RBI ने दिल्या महत्वाच्या सूचना

परंतु, त्यानंतर ब्लांकासोबत तिच्या कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही. दोन आठवडे झाल्यानंतरही ब्लांकासोबत कुटुंबीयांचं काहीच बोलणं झालं नाही, त्यानंतर अखेर कार्लाने ब्लांकाला शोधण्यासाठी ट्विटरच्या माध्यमातून आवाहन केलं.” मी अशा परिस्थितीत असेन, असं मला कधीच वाटलं नाही. माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या आणि प्रेमळ व्यक्तीला शोधण्यासाठी मला मदतीचं आवाहन करावं लागत आहे.” असं ट्विट कार्लाने सोशल मीडियावर केलं. त्यानंतर कार्लाच्या तक्रारीची स्थानिक पोलिसांनी तातडीनं दखल घेतली आणि शोधमोहीम सुरु केली. पोलिसांनी या गंभीर घटनेचा तपास सुरु केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 13:10 IST
Next Story
26/11 Mumbai Terror Attack: आता अमली दहशतवाद्यांनी शोधून काढला तस्करीचा नवा सागरीमार्ग, इराण ते मुंबई व्हाया…!