मुंबई : एसटी महामंडळाच्या बसमध्ये तिकीट काढताना प्रवाशांचा अनेक वेळा वाहकसोबत वाद होतो. सुट्टया पैशांवरून वाद होवू नयेत, यासाठी एसटी महामंडळाने डिसेंबर २०२३ मध्ये डिजिटल पेमेंटला सुरुवात केली. या सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून दिवसाला ५ ते ६ हजार प्रवासी यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढत आहेत. यामुळे दरमहा ४ ते ५ कोटी रुपये महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात जमा होत आहे. तसेच वाहकाचे सुट्टे पैसे सांभाळण्याचे कामही हलके होत आहे.

सर्वत्र डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे बहुसंख्य प्रवासी रोख व्यवहार करण्याऐवजी ऑनलाइन व्यवहार करणे पसंत करतात. एसटी महामंडळानेही डिजिटल व्यवहाराचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध केला आहे. प्रवाशांना बसमध्ये तिकिट काढण्यासाठी फोन पे, गूगल पे यांसारखी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वाहकाकडील ॲड्राईड तिकीट यंत्रावरील क्युआर कोडद्वारे प्रवाशांना तिकीटाचे पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य होत आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा सुट्या पैशांवरून वाहकासोबत होणारा वाद संपुष्टात येऊ लागला आहे, असे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”

हेही वाचा : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, ईशान्य मुंबईतील झोपडपट्ट्यांचा विकास संथगती

एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. या तुलनेत यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे. सध्या एसटी महामंडळातील सुमारे ३४ हजार वाहकांकडे ॲड्रॉईड इलेक्ट्रिक तिकीट यंत्र आहे. बहुतेक वाहकांना हे मशीन जलदगतीने व्यवस्थित हाताळता येत नाही. त्यामुळे वाहक प्रवाशांकडे रोख रकमेने तिकीट काढण्याचा आग्रह धरतात. तसेच यूपीआय पेमेंटबाबत प्रवाशांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. तसेच वाहकांना ॲड्रॉईड इलेक्ट्रिक तिकीट यंत्र चालवण्याबाबत प्रशिक्षित करणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांकडून केली आहे.

हेही वाचा : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज

उत्पन्नात वाढ

महिना – ऑनलाइन तिकिटे खरेदी – एकूण रक्कम

डिसेंबर २०२३ – ६६,०७८ – १.१८ कोटी रुपये

जानेवारी २०२४ – १,०९,४९५ – ३.१२ कोटी रुपये

फेब्रुवारी २०२४ – १,३३,१५४ – ४.१० कोटी रुपये

मार्च २०२४ – २,०५,९६१ – ५.८६ कोटी रुपये