Kangana Ranaut On Jaya Bachchan Controversy : बॉलिवूड अभिनेत्री तथा खासदार कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती नेहमी रोखठोक मतं मांडते. विविध विषयांवर बिनधास्त प्रतिक्रिया दिल्यामुळे अनेकदा ट्रोलही होते. दरम्यान, कंगना रणौत आता सपाच्या खासदार जया बच्चन यांच्यावर भडकल्याचं पाहायला मिळालं आहे.

खासदार जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन या सेल्फी काढणाऱ्या एका व्यक्तीला ढकलताना दिसत आहेत. जया बच्चन यांचं हे वागणं पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच कंगना रणौतनेही जया बच्चन यांचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवत त्याला कॅप्शन देत खोचक टीका केली आहे. ‘जया बच्चन या अमिताभ यांच्या पत्नी आहेत म्हणून त्यांचे नखरे लोक सहन करतात’, असं कंगना रणौतने म्हटलं आहे.

कंगना रणौतने काय म्हटलं?

भाजपा खासदार कंगना रणौत यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला. तसेच त्या व्हिडीओला कॅप्शन देत जया बच्चन यांच्यावर टीका केली. कंगना रणौतने जया बच्चन यांना ‘बिघडलेली आणि विशेषाधिकारप्राप्त महिला’, असं म्हटलं आहे. तसेच अमिताभ बच्चन यांची पत्नी आहे म्हणून लोक त्यांचा राग आणि नखरे सहन करतात”, असं कंगना रणौतने म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

खासदार जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मंगळवारी (१२ ऑगस्ट) आयोजित कार्यक्रमाला जया बच्चन उपस्थित होत्या. यावेळी एका व्यक्तीने त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, जे पाहून जया बच्चन खूप संतापल्या. जया बच्चन यांना हे अजिबात आवडलं नाही. त्यांनी त्या व्यक्तीला ढकललं आणि “तू काय करतोयस? काय आहे हे?” असं रागाने म्हटलं. त्यांना रागावलेलं पाहून ती व्यक्ती स्तब्ध झाली आणि जया त्याच्याकडे रागाने पाहत राहिल्या. हा व्हिडीओ ANI वर शेअर करण्यात आला आहे.

ही घटना तेथील उपस्थितांनी कॅमेऱ्यात कैद केली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जया बच्चन यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, जया बच्चन या सुप्रसिद्ध अभिनेत्री असून त्या कायमच चर्चेत असतात. जया यांचा चाहतावर्गसुद्धा खूप मोठा आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केल्यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. पण, हल्ली जया बच्चन त्यांच्या रागामुळे चर्चेत असतात. अनेकदा त्या पापाराझींवर, चाहत्यांवर रागावलेल्या दिसतात. जया यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.