Bomb Threat to Donald Trump Cabinet : अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या प्रशासनात निवडून आलेल्या अनेकांना मंगळवार-बुधवारी जीवघेण्या धमक्या आल्या आहेत. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, ज्यांना संरक्षण, गृहनिर्माण, कृषी, कामगार विभागाच्या जबाबदाऱ्या मिळणार होत्या, त्यांना या धमक्या मिळाल्या. या धमक्या पॅलेस्टाईन समर्थकांकडून दिल्या गेल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

ट्रम्प मंत्रिमंडळात नवीन प्रेस सेक्रेटरी म्हणून निवड झालेल्या कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने तपास सुरू केला आहे. मात्र, या धमक्या कोणाला मिळाल्या हे लेविट यांनी स्पष्ट केले नाही.

अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की ते राजकीय हिंसाचाराच्या या धमक्यांचा निषेध करतात. अहवालानुसार, ज्या लोकांना धमक्या आल्या आहेत त्यापैकी कोणालाही अमेरिकन सीक्रेट एजन्सीकडून संरक्षण मिळालेले नाही. आतापर्यंत ८ नेत्यांना धमक्या मिळाल्या आहेत, असे एफबीआयने म्हटले आहे. त्यांनी धमक्या गांभीर्याने घेतल्या आहेत. बॉम्बच्या धमक्यांसोबतच ‘स्वॅटिंग’चीही काही प्रकरणे समोर आली आहेत.

हेही वाचा >> इस्रायल-हेजबोलामध्ये युद्धविराम; अमेरिका-फ्रान्सच्या मध्यस्थीला यश, जगभरातून स्वागत

स्वाटिंग अमेरिकेच्या ‘स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिक्स (SWAT)’ शी संबंधित आहे. यामध्ये धोक्याची खोटी माहिती देऊन कॉल केले जातात आणि SWAT टीमला पीडितेच्या घरी पाठवले जाते. कोणत्या लोकांना धमक्या आल्या हेही एफबीआयने सांगितले नाही. ज्यांना धमक्या आल्या आहेत त्यांनी स्वतः सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.

एलिस स्टेफानिक यांना पहिली धमकी

एलिस स्टेफानिक यांना पहिली धमकी मिळाली. एलिस स्टेफानिक यांची संयुक्त राष्ट्रात राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचं घर बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी त्यांना मिळाल्याची बातमी त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. स्टेफनिकन यांनी सांगितले की त्या वॉशिंग्टन ते साराटोगा काउंटीला त्यांच्या नवरा आणि तीन वर्षांच्या मुलासह प्रवास करत होत्या. त्यानंतर त्यांना ही धमकी मिळाली. अहवालानुसार, आतापर्यंत ८ जणांनी धमक्या आल्याचा दावा केला आहे.

संरक्षण मंत्रीपदासाठी ज्यांचं नाव निश्चित झालं आहे त्या पीट हेगसेथ यानांही धमकी मिळाली असून ते अशा धमक्यांना घाबरत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर, पर्यावरण संरक्षण संस्थेच्या प्रमुखपदी निवड झालेल्या ली गेल्डिन यांनी सांगितले की, त्यांच्या घराला पाईप बॉम्बने धमकी देण्यात आली होती. या धमक्यांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लिहिलेल्या संदेशांचा समावेश होता. धमकी दिली तेव्हा त्याचे कुटुंबीय घरी नव्हते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी डीबीआय संचालक म्हणाले की ९० टक्के धमक्या खोट्या ठरतात, परंतु कोणत्याही धोक्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असू शकते.