साना येथे शनिवारी एका तपासणी नाक्यावर प्लास्टिक बॅगेत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यामध्ये तीन पोलीस ठार झाले, तर एक जण जखमी झाला, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस तपासणी नाक्याजवळच प्लास्टिकच्या पिशवीत बॉम्ब दडवून ठेवण्यात आला होता. तपासणीसाठी पोलिसांनी पिशवी उघडताच रिमोटच्या साहाय्याने त्या बॉम्बचा स्फोट घडविण्यात आला. त्यामध्ये दोन पोलीस जागीच ठार झाले आणि दोन गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. या घटनेनंतर स्थानिक परिसराची नाकेबंदी करून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2013 रोजी प्रकाशित
येमेनमधील स्फोटात तीन पोलीस ठार
साना येथे शनिवारी एका तपासणी नाक्यावर प्लास्टिक बॅगेत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यामध्ये तीन पोलीस ठार झाले, तर एक जण जखमी झाला, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.

First published on: 07-07-2013 at 03:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bomb blast kills 3 police officers in yemen