scorecardresearch

अपघातानंतर क्रिकेटर ब्रेन डेड, कुटुंबियांनी अवयवदान करत दिलं आठ रुग्णांना नवं आयुष्य

१७ नोव्हेंबरला झालेल्या अपघातात अनमोलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले

अपघातानंतर क्रिकेटर ब्रेन डेड, कुटुंबियांनी अवयवदान करत दिलं आठ रुग्णांना नवं आयुष्य
क्रिकेटर अनमोल जैनचा अपघातात मृत्यू झाला. (फोटो-आयएएनएस ट्विटर)

अपघातानंतर ब्रेन डेड घोषित करण्यात आलेल्या भोपाळमधील अनमोल जैन या २५ वर्षीय युवकाच्या कुटुंबियांनी त्याचे अवयव आठ रुग्णांना दान केले आहेत. अनमोलचे हृदय, यकृत, दोन मूत्रपिंड, डोळे आणि त्वचा सोमवारी भोपाळ, इंदूर आणि अहमदाबादमधील रुग्णांना दान करण्यात आली, असे वृत्त ‘एएनआय’ने दिलं आहे. दु:खातून सावरत जैन कुटुंबियांनी इतर रुग्णांच्या मदतीसाठी अवयवदान केलं आहे.

अपघातात अनमोलचा मृत्यू

१७ नोव्हेंबरला झालेल्या अपघातात अनमोलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर अनमोलच्या कुटुंबियांनी त्याचे अवयव दान करून इतर रुग्णांना नव्या आयुष्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती भोपाळच्या सिद्धान्ता रुग्णालयातील वैद्यकीय संचालक सुबोध वार्ष्णेय यांनी दिली आहे. अनमोल हा एक चांगला क्रिकेटर होता. तो डीबी मॉलमधील एका कंपनीत कार्यरत होता.

आक्रमक फलंदाजीच नाही, गोलंदाजीतही भेदक मारा, कोण आहेत भारताचे भविष्यातील अष्टपैलू खेळाडू? वाचा सविस्तर

अवयवांच्या वाहतुकीसाठी तीन ग्रीन कॉरिडोर

गुजरात, इंदूर आणि स्थानिक रुग्णालयात अनमोलच्या अवयव प्रत्यारोपणासाठी तीन ग्रीन कॉरिडोर राबवण्यात आले. अनमोलचे हृदय विमानतळावर नेण्यासाठी, तर यकृत इंदूरला पाठवण्यासाठी ग्रीन कॉरिडोर राबवण्यात आला. काही अवयवांचे प्रत्यारोपण यशस्वीरित्या झाल्याची माहिती डॉ. वार्ष्णेय यांनी दिली आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी तीन कॉरिडोर राबवण्याची भोपाळमधील ही पहिलीच घटना असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 14:23 IST

संबंधित बातम्या