या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना हा फ्लूचा किरकोळ विषाणू आहे, अशी संभावना करणारे ब्राझीलचे अध्यक्ष याइर बोल्सोनारो यांची कोविड १९ चाचणी सकारात्मक आली असून त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी ब्राझीलमध्ये करोनाची साथ हाताळताना अत्यंत निष्काळजीपणाचे धोरण ठेवले असून टाळेबंदी लागू करण्यासही विरोध केला होता.

ब्राझील हा लॅटिन अमेरिकेतील मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे.  करोना संसर्ग झाल्यानंतर त्यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी अगदी ठणठणीत असून हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या घेत आहे. बोल्सोनारो हे ६५ वर्षांचे असून त्यांनी आतापर्यंत कुठल्याही शिफारशींचे पालन केले नाही. मुखपट्टी न वापरता ते गर्दीत मिसळत होते, हस्तांदोलनही करीत होते. लक्षणे दिसल्यानंतर मात्र त्यांनी सामाजिक अंतराचा निकष सोमवारपासून पाळून मुखपट्टी परिधान करण्यास सुरुवात केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brazilian president bolsonaro contracted coronavirus abn
First published on: 08-07-2020 at 00:43 IST