पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकानंतर पेट्रोलच्या कींमतीत सतत वाढ होत आहे.  मे महिन्यात, इंधनाची किंमत एकूण १० दिवस वाढविण्यात आली आहे. या १० दिवसात पेट्रोल प्रतिलिटर २.२१ रुपयांनी महाग झाले आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर २.२२ रुपयांनी महाग झाले आहे. दरम्यान, आज (सोमवार) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी रविवारी किरकोळ इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली होती. रविवारी पेट्रोल २४ पैशांनी तर डिझेल २७ पैशांनी महागले होते.

काय आहे पेट्रोल आणि डिझेलची किंमत

दिल्लीत पेट्रोलची किंमत ९२.५८ रुपये प्रतिलिटर करण्यात आली आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर ८३.२२ रुपये झाला आहे. तर मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ९४.३४ रुपये आहे. तर डिझेल ९०.४० रुपये प्रति लिटर विकले जात आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल ९४.३४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८८.०७ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ९२.६७ रुपये आणि डिझेलची किंमत ८६.०६ रुपये प्रतिलिटर झाली आहे.

तसेच भोपाळमध्ये पेट्रोल १००.६३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९१.५९ रुपये प्रति लिटरला विकले जात आहे. लखनौमध्ये पेट्रोल ९०.३७ आणि डिझेल ८३.६० प्रती लिटर विकले जात आहे.

देशात तेलाच्या दरांमध्ये दररोज सकाळी ६ वाजता सुधारित केले जातात. कारण देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजेपासून लागू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या फोनवरून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे आपण जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल, RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.