breakthrough in murder case Crime News : सायबराबाद येथील घरात एका ५० वर्षीय महिलेची हत्या करून लाखो रुपयांचे सोने लुटल्याच्या संशयावरून हैदराबाद पोलिसांनी दोन संशयित आरोपींना झारखंड येथूनअटक केली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीसाठी त्यांना परत आणले जात आहे.

तीन दिवसांपूर्वी ही हत्या करण्यात आली होती, ज्यामध्ये पीडित महिलेवर पहिल्यांदा प्रेशर कुकरने हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर चाकू आणि कात्रीने तिचा गळा चिरण्यात आला होता. या आरोपींनी या महिलेच्या घरातील मौल्यवान वस्तू लुटल्या आणि पळून जाण्याच्या आधी अंघोळ देखील केली होती.

रेणु अग्रवाल (५०) ही महिला सायबराबाद आयटी हब येथील तिच्या १३ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पतीला मृत अवस्थेत आढळून आली. अग्रवाल आणि त्यांचा मुलगा हे कामानिमीत्त बाहेर होते त्यावेळी हा गुन्हा घडला. महिलेला केलेले फोन कॉल तिने उचलले नाहीत, त्यामुळे हे दोघे घरी लवकरत परत आले. घरी पोहचताच त्यांना हा सगळा प्रकार आढळून आला.

घराचा मुख्य दरवाजा लॉक होता, त्यामुळे ते प्लंबरच्या मदतीने फ्लॅटच्या बाल्कनीमधून घरात गेले, तर त्यांना अग्रवाल या मृत अवस्थेत आढळून आल्या.

पोलिसांनी सांगितले की पीडितेचे हात आणि पाय बांधण्यात आलेले होते, आणि त्यांना प्रेशर कुकरने मारहाण करण्यात आली होती. आरोपींनी चाकू आणि कात्रीने महिलेचा गळा चिरला ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. तर आरोपी जवळपास ४० ग्रॅम सोने आणि १ लाख रुपये कॅश घेऊन पळाले होते.

पळून जण्याच्या आधी आरोपींनी त्यांच्याच घरात अंघोळ देखील केली. त्यांनी कपडे बदलले आणि त्यांचे रक्ताने माखलेले कपडे मागे ठेवून पळून गेले, असे पोलिसांनी सांगितले. अग्रवाल यांचा मृतदेह तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

अवघ्या १० दिवसांपूर्वी ठेवलं होतं कामावर

पोलिसांना या प्रकारणाच्या प्राथमिक तपासादरम्यान झारखंड कनेक्शन आढळून आले. दोघे आरोपी जे घरातील कामे करायचे सीसीटीव्हीमध्ये १३व्या मजल्याकडे जाताना आणि संध्याकाळी ५:०२ वाजता निघताना दिसून आले. त्यांच्यापैकी एक अग्रवाल यांच्याकडे कामाला होता, जो झारखंडचा होता आणि त्याला १० दिवसांपूर्वी एका मॅनपावर एजन्सीच्या माध्यमातून कामावर ठेवण्यात आले होते, तर दुसरा त्याच्या शेजारील मजल्यावरच्या घरात काम करत होता. दोघे आरोपी हे एका दुचाकीवरून पळून जाताना दिसून आले होते, ही दुचाकी दुसऱ्या आरोपीच्या मालकाची होती.