भारत-पाकिस्तानमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धातील विजयाचे शिल्पकार निवृत्त ब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदपुरी यांचं आज निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. महावीरचक्राने सन्मानित करण्यात आलेल्या कुलदीप सिंग गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी ८.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कुलदीप सिंग यांचा दुसरा मुलगा जर्मनीहून परतल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती हरदीप सिंग चंदपुरी यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५ आणि ६ डिसेंबर १९७१ रोजी राजस्थान येथील लोगेंवाला सीमेवर पाकिस्तानकडून मध्यरात्री हल्ला करण्यात आला होता. यावेळी पंजाब तुकडीचे नेतृत्व कुलदीप सिंग यांनी केलं होतं. या युद्धात भारताच्या विजयाचे ते शिल्पकार ठरले. त्यांच्या योगदानामुळे महावीरचक्राने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

ब्रिगेडियर कुलदीप सिंग यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४० ला गुर्जर शीख कुटुंबात झाला होता. भारतातल्या पंजाबमध्ये त्यांचं कुटुंब वास्तव्याला होतं. त्यांच्या जन्मानंतर कुटुंबीय बालाचौरमधल्या चांदपूरमध्ये वास्तव्याला गेले. १९६२ मध्ये त्यांनी होशियारपूरमधल्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून पदवी संपादन केली होती. त्यानंतर ते भारतीय लष्करात सामील झाले.

चित्रपट निर्माते जे. पी. दत्ता यांनी या घटनेवर आधारित ‘बॉर्डर’ चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात सनी देओल याने कुलदीप सिंग यांची भूमिका साकारली होती. सनी देओलने ट्विटरदवारे आपले दुख व्यक्त केले आहे.

Sad to know that Brigadier Kuldeep Chandpuri passed away today .
We will forever stay indebted to this great soldier pic.twitter.com/XLcU3exIoa

— Sunny Deol (@iamsunnydeol) November 17, 2018

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brigadier kuldeep chandpuri passed away today
First published on: 17-11-2018 at 18:13 IST