ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची धुरा मूळ भारतीय वंशाचे ऋषी सुनक सांभाळत आहे. लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुनक यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. भारतातील ब्रिटनच्या उच्चायुक्त एलेक्स इल्लीस यांनी “इंडिया टुडे कॉन्क्लेव’ या कार्यक्रमात बोलताना सुनक यांच्यावर भाष्य केलं आहे. सुनक हे पंजाबी वंशाचे हिंदू आहेत. मात्र, त्यांचं हृदय आणि मन ब्रिटिश आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.

British PM Rishi Sunak: “विजय मामा, ऋषी बोलतोय… ब्रिटनला या”; ब्रिटनच्या पंतप्रधानांचा फोन कॉल व्हायरल

bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

“आधुनिक इंग्लंड वैविध्यपूर्ण आहे. सुनक हे शीर्षस्थानी पोहोचले कारण ते त्यासाठी योग्य आणि सक्षम व्यक्ती आहेत. त्यांच्या प्रतिभेमुळेच ते शक्य झालं आहे”, असे एलेक्स यांनी म्हटले आहे. यावेळी ब्रेक्झिटनंतर इंग्लंड-भारत संबंधांवरदेखील राजदुतांनी प्रतिक्रिया दिली. “हे भूराजकीयदृष्ट्या तणावपूर्ण जग आहे. आम्हाला स्थलांतर आणि व्यापार धोरणांविषयी बऱ्याच संधी आहेत. बोरिस जॉन्सन, लिझ ट्रस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध होते. त्याचप्रमाणे आता ऋषी सुनक यांच्यासोबतही इंग्लंडचे चांगले संबंध असतील”, असे त्यांनी म्हटले आहे.

Photos : ब्रिटनच्या संसदेत भगवद्गीतेला स्मरुन शपथ ते ६ हजार कोटींचे मालक; ऋषी सुनक यांच्याबद्दलच्या १० गोष्टी

या कार्यक्रमात विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाबाबत एलेक्स यांना प्रश्न विचारण्यात आला. “हा आता सरकारी विषय राहिलेला नाही. प्रत्यार्पणावर तीन वर्षांपूर्वीच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आता हा मुद्दा न्यायालयात आहे. इंग्लंड फरार लोकांसाठीचं स्थान व्हावं, अशी आमची इच्छा नाही. याबाबत लवकरच न्याय होईल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Twitter Down : एलॉन मस्क यांचा कर्मचारी कपातीचा इशारा Twitter च्याच अंगाशी आला? अनेक ठिकाणी सेवा ठप्प

मुक्त व्यापार करारानुसार दोन्ही देशांमध्ये रोजगाराच्या संधी वाढत आहेत. इंग्लंडमधील उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांसाठी आम्हाला भारतीय बाजारपेठेत अधिक प्रवेश हवा आहे, ज्यामुळे इंग्लडमधील ग्राहकांना त्याचा फायदा होईल, असेही एलेक्स यांनी म्हटले आहे.