BSF jawan detained by Pakistan Rangers : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केल्याच्या घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. यादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान पंजाबमध्ये चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाला पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आळी आहे. अधिकार्यांनी गुरुवारी पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली आहे.
ही घटना बुधवारी फिरोजपूरजवळ घडली असून गणवेशात असलेले आणि सर्व्हिस रायफल घेतलेले ८२ व्या बटालियनचे कॉन्स्टेबर पीके सिंग हे स्थानिक शेतकऱ्यांबरोबर सावली शोधत असताना चुकून सीमेच्या पलीकडे गेले. त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी दोन्ही देशांच्या सीमा दलांमध्ये संवाद शुरू आहे त्याच्या सुरक्षित परतीसाठी दोन्ही सीमा दलांमध्ये सध्या संवाद सुरू आहे.
भारत पाकिस्तान यांच्यात तणाव
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री दिल्लीतील पाकिस्तानचे सर्वोच्च राजदूत साद अहमद वॉरैच यांना बोलावून त्यांच्या लष्करी राजदूतांसाठी औपचारिक पर्सोना नॉन ग्राटा नोट (भारत सोडण्यासाठी औपचारिक पत्र) सोपवली आहे. मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्यानंतर भारताने ही कारवाई केली आहे.
तसेच बुधवारी (२३ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षणविषयक केंद्रीय समितीच्या (सीसीएस) बैठकीनंतर १९६०च्या ‘सिंधू जल करारा’स स्थगिती देण्याचा निर्णय घेतला गेला. बुधवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन सिंधू जल कराराला इतिहासात प्रथमच स्थगिती देण्यात येत असल्याचे म्हटले. तसेच अटारी-वाघा सीमा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबरोबरच पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना या मार्गाने १ मेपर्यंत परत येता येईल. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षणविषयक सल्लागारांना आठवड्याभरात भारत सोडण्याचा आदेश दिला गेला आहे.