बीएसएफ जवान तेजबहादूर यांना बडतर्फ केल्यानंतर त्यांच्या पत्नीचा व्हिडिओ समोर आला आहे. तेज बहादूर यादव यांनी फक्त जवानांच्या बाजूने समस्या मांडली होती. त्यामध्ये प्रतिमा मलीन होण्यासारखे काय होते. असा सवाल यादव यांची पत्नी शर्मिला यांनी केला आहे. त्यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे कुठलीही आई आपल्या मुलाला सीमेवर पाठवण्याचे धैर्य करणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. यादव यांना बुधवारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. बीएसएफची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

[jwplayer QexJSktM]

अंतर्गत चौकशीनंतर त्यांच्यावर हा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर बीएसएफने ही कारवाई केली आहे. तेजबहादूर यादव यांनी काही महिन्यांपूर्वी सुरक्षा दलाच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न देण्यात येत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यादव यांनी जवानांची व्यथा मांडणारा व्हीडीओ पोस्ट केल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला होता. या मुद्द्यावर देशात मोठी खळबळ उडाली होती. तेजबहादूर यादव यांना सेवेतून बडतर्फ करून सरकारने मोठी चूक केली आहे. यादव यांनी केवळ तेथील परिस्थिती त्या व्हिडीओतून दाखवली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० वर्षांहून अधिक सेवा केल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय खूपच चुकीचा आहे, अशी प्रतिक्रिया तेजबहादूर यांची पत्नी शर्मिला यांनी व्यक्त केली आहे. बीएसएफ जवानांना मिळणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असते. अनेकदा जवानांना ११ तास बर्फात उभे राहूनही उपाशी पोटी झोपावे लागते, असा दावा तेजबहादूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओतून केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात आणि लष्करात प्रचंड खळबळ उडाली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते. बीएसएफने या प्रकरणी गृहमंत्रालयाला अहवाल सादर केला होता. त्यात तेजबहादूर यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले होते. दरम्यान या प्रकरणाचा अंतिम अहवाल अद्याप मिळाला नाही.

[jwplayer wYyGw3K7]