मोबाइल कंपन्यांच्या तीव्र स्पर्धेच्या युगात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने एक नवी योजना लाँच केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या ग्राहकांना भेट म्हणून केवळ १४४ रुपयांमध्ये अमर्यादित फोन कॉल्स आणि ३०० एमबी डाटा मोफत मिळणार आहे, अशी घोषणा बीएसएनएलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी केली.
ही योजना प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे. रिलायन्स जिओच्या घोषणेनंतर अनेक कंपन्यांनी आपली सेवा स्वस्त केली आहे. एअरटेल, व्होडाफोन आइडिया सेल्युलर या कंपन्यांनी आपली सेवा स्वस्त केली आहे तसेच ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. रिलायन्सने आपली अमर्यादित मोफत कॉल्सची योजना ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. देशभरामध्ये आणखी वाय-फाय हॉटस्पॉट लाँच करण्याचा निर्णय बीएसएनलने घेतला आहे. सध्या बीएसएनलने ४,४०० हॉटस्पॉट लाँच केले आहेत. पुढील एका वर्षात ४०,००० वाय-फाय लाँच केले जाणार आहेत. बीएसएनएलने केंद्र सरकारकडून २,५०० एमएचझेडचे स्पेक्ट्रम मिळवले आहे.