कर्जात बुडालेले उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला (आर इन्फ्रा) भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) ६४८ कोटी रूपयांचे काम दिले आहे. कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. राजकोट जिल्ह्यातील हिरासर येथे नवीन विमानतळ उभारले जाणार आहे. नवीन विमानतळ हे अहमदाबाद आणि राजकोटला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ८ ब येथून जाणाऱ्या मार्गावर आहे. सध्या कार्यरत असलेल्या राजकोट विमानतळापासून नवीन विमानतळ हे ३६ किमी दूर आहे. आर इन्फ्राने लार्सन अँड ट्रूबो, दिलीप बिल्डकॉन तसेच गायत्री प्रोजेक्ट्स समवेत ९ कंपन्यांपेक्षा कमी रकमेची बोली लावून हे काम मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर इन्फ्राने एक निवेदन प्रसिद्ध करुन म्हटले आहे की, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. ई अँड सीला (इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन्स) गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील हिरासर येथे नवीन विमानतळ बनवण्याचे काम करण्याचे काम मिळाले आहे. हे काम ६४८ कोटी रूपयांचे आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की, या करारात रनवे निर्मिती, टर्निंग पॅड, टॅक्सी लाइन, रस्ते, अग्निशामक स्थानक, कुलिंग पिट, एअरफिल्ड ग्राऊंड लायटिंग योजनेचे परीक्षणसह नेव्हिगेशन आणि पक्षांमुळे होणारी अडचण कमी करण्यासाठीचा उपाय आदी कामांचा समावेश आहे. रिलायन्स इन्फ्राचे ९ कंपन्यांमध्ये तांत्रिक गुण हे ९२.२ टक्के होता. काम करण्याची ऑर्डर मिळाल्यानंतर ३० महिन्याच्या आत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Businessman anil ambani company gets 648 crore contract to build new airport in gujrat
First published on: 07-03-2019 at 10:51 IST