इस्लामाबाद : पाकिस्तानने भारताच्या प्रभारी राजदूताला पाचारण करून, कर्नाटकमध्ये मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावर घातलेल्या बंदीबाबत आपली गंभीर चिंता कळवली.

भारतात मुस्लिमांविरुद्धची कथित धार्मिक असहिष्णुता, नकारात्मक साचेबंद चित्रण आणि भेदभाव याबाबत पाकिस्तानला वाटणारी अतीव चिंता भारतीय राजदूतांना कळवण्यात आली, असे परराष्ट्र कार्यालयाने बुधवारी उशिरा रात्री एका निवेदनात सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 कर्नाटकमध्ये महिलांचा छळ करणाऱ्या सूत्रधारांना भारतीय सरकारने वठणीवर आणावे आणि मुस्लीम महिलांची सुरक्षा व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पुरेसे उपाय योजावेत, यावर भर देण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुस्लीम मुलींना शिक्षणापासून वंचित करणे हे मूलभूत मानवी अधिकारांचे गंभीर उल्लंघन असल्याचे सांगून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी कर्नाटकातील हिजाब वादावर भाष्य केल्यानंतर परराष्ट्र कार्यालयाने हे निवेदन जारी केले.