Delhi HC : महिलेला अश्लील शिवीगाळ करणं तिला विशिष्ट शिवी देऊन हि हिणवणं हा तिच्या स्त्रीत्वचा अपमान आहे. तसंच हे संबोधन थेट असं दर्शवतं की ही शिवी देणाऱ्या पुरुषाला तिच्याबाबत काहीही वाटत नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने हा शब्द उच्चारणाऱ्या एका आरोपीला दोषी ठरवलं आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय?

आरोपीने हे म्हटलं आहे, “*** दरवाजा उघड मला…” आणि पुढे शिव्या देऊन शरीरसंबंधांची मागणी केली आहे. तू *** किती समजदार आहेस, स्वतःला काय समजतेस मला माहीत आहे. तू *** आहेस दरवाजा उघड नाहीतर मी तुला सोडणार नाही असं म्हणत महिलेचा अपमान केला. अशा अश्लील आणि महिलेचा अपमान करणाऱ्या अपशब्दाचा उच्चार पुरुष तेव्हाच करतो जेव्हा त्याला तिच्यावर विश्वास नसतो. तसंच या आरोपीने जी शिवी दिली ती महिलेच्या विशिष्ट अवयवांशी संबंधित आहे. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या दृष्टीने ही शिवी दिली गेली आहे. तसंच एकदा नाही तर अनेकदा ही शिवी देऊन सदर आरोपीने महिलेच्या स्त्रीत्वाचा अपमान केला आहे. त्यामुळे या प्रकरणात सदर आरोपी दोषी आहे.

आरोपीने महिलेला ठार करण्याचीही धमकी दिली

न्यायालयाने पुढे असं म्हटलं आहे की, महिलेला ती शिवी वारंवार दिल्यानंतर आरोपी गप्प बसला नाही. त्याने महिलेला सांगितलं माझ्याशी शरीरसंबंध ठेवले नाहीस तुझ्यावर मी बलात्कार करेन आणि तुझी हत्या करेन. आरोपीने दिलेल्या या धमक्यांसाठीही आम्ही त्याला दोषी ठरवत आहोत. दरवाजा उघड नाहीतर तुला गोळ्याच घालतो अशी थेट जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे कलम ५०३ च्या अंतर्गत आम्ही आरोपीला दोषी ठरवत आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं हे प्रकरण काय?

एक महिला तिच्या पतीसह आणि मुलीसह एका भाडे तत्त्वावरच्या घरात राहात होती. तिला विक्रांत नावाच्या आरोपीने फोन करुन अत्यंत अश्लील शिवीगाळ केली. तसंच शरीरसंबंध ठेवले नाहीस तुझ्यावर बलात्कार करेन आणि तुझी हत्या करेन अशाही धमक्या दिल्या. २०२१ मधलं हे प्रकरण आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने या विक्रांतला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात पीडितने नोंदवलेला जबाब आणि कोर्टाला जे सांगितलं ते विश्वनीय आहे. तिच्या जबाबावर काही संशय घ्यावा असे कुठलेही पुरावे किंवा कुठल्याही बाबी समोर आलेल्या नाहीत. मात्र आरोपी विक्रांतने तिला अपशब्द वापरले आणि तिचा अपमान केला. तिच्या स्त्रीत्वाचा अपमान केला. त्यामुळे आम्ही विक्रांतला दोषी ठरवत आहोत असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. barandbench.com ने हे वृत्त दिलं आहे.