केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ने आज आयकर विवरणपत्र (आयटीआर) फाइल करण्यासाठी अगोदर निर्धारित केलेली ३१ जुलै ही तारीख वाढवून आता ३१ ऑगस्ट केली आहे. इन्कम टॅक्स विभागाने याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयकर विवरणपत्र फाइल करण्याच्या ३१ ऑगस्ट या अंतिम तारखेनंतर दंड देखील द्यावा लागू शकतो. त्यामुळे अंतिम तारखेच्या आतच आयटीआर फॉर्म फाइल करणे फायद्याचे राहणार आहे. यासाठी फॉर्म १६ आणि पॅन कार्डसारख्या अन्य कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स रीटर्न फाइल करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही करदात्यांना या मुदतीत आयटीआर फाइल करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे याची मुदत वाढवण्याची मागणी होत होती.

आयटीआर प्रत्येकवर्षी फाइल करणे बंधनकारक आहे. आयटीआर फाइल केला नाहीतर आयकर विभागाकडून नोटीस अथवा दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbdt extends the due date for filing of income tax returns msr
First published on: 23-07-2019 at 22:00 IST