अहमदाबाद येथे झालेल्या चकमकीत इशरत जहाँसमवेत मारले गेलेले अमजद अली राणा आणि झिशान जोहर यांचे राष्ट्रीयत्व शोधण्याचे प्रयत्न केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केले आहेत.
चकमकीप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचे सीबीआयने ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून या दोघांच्या राष्ट्रीयत्वाचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी वृत्तपत्रांमध्ये या दोघांसंबंधी जाहिरातही प्रसारित करण्यात आली असून त्यामुळे जे कोणी त्यांना ओळखत असतील, ते पुढे येऊन त्यांची माहिती देतील, अशी अपेक्षा असल्याचे सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी येथे सांगितले. इशरत आणि जावेद यांच्याबद्दलची माहिती सीबीआयला त्यांचे नातेवाईक आणि परिचितांकडून मिळाली आहे. मात्र, राणा याच्यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार तो वेगवेगळ्या नावांनी वास्तव्य करून राहत असल्याचे साक्षीदारांच्या माहितीवरून उघड झाले आहे.